Goa Politics: गांधींच्या नावावर 70 वर्षे एका कुटुंबाने केवळ सत्ता उपभोगली; CM सावंत यांची कॉंग्रेसवर टीका

मडगावातील कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेसवर टीका केली.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: मडगावातील कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेसवर टीका केली. दरम्यान त्यांनी गांधी कुटुंबावर आरोप केला. ते म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व राहुल गांधी यांचा कोणताही संबंध नाही; गांधींच्या नावावर 70 वर्षे एका कुटुंबाने केवळ सत्ता उपभोगली आहे." असा आरोप त्यांनी मेळाव्यात केला.

(For 70 years only one family enjoyed power in name of Gandhi CM Sawant criticizes Congress)

CM Pramod Sawant
Goa Petrol Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलच्या किंमती जाहीर; जाणून घ्या आजचे दर

गोव्यात काँग्रेस कोसळत आहे

या कार्यक्रमादरम्यान दिगंबर कामत म्हणाले की, मी माझ्या लोकांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये सामील झालो आहे. आणि यापुढे मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिक भक्कमपणे राज्यात विकास कामे मार्गी लावू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आठ आमदारांनी पक्षांतर केल्यानंतर अवघे तीन आमदार शिल्लक असलेल्या काँग्रेस राज्यात पक्ष पुर्नबांधणीला सुरूवात केली. जुन्या सर्व समित्या बरखास्त केल्या. नव्यानं पक्ष उभारणीसाठी लागलेल्या काँग्रसेला मडगावमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे नुकतीच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळालेले युरी आलेमाव व ज्येष्ठ काँग्रेस नेते कार्लुस फरेरा काय भुमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

CM Pramod Sawant
Goa Monsoon: तापमानवाढीमुळे ढगफुटी सदृश पाऊस!

2,500 समर्थकांसह 'हा' काँग्रेस नेता भाजपात दाखल; गळती थांबेना

गोव्यात काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. आठ काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला आणखी एक झटका लागला आहे. काँग्रेसचे माजी विभाग प्रमुख गोपाळ नाईक यांनी 2,500 हजार समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मडगाव येथील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे उपस्थित होते. मडगाव येथील कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान झालेल्या या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे दिगंबर कामत यांच्या मास्टरस्ट्रोकची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, काँग्रेसला हा आणखी एख मोठा धक्का मानला जात असून, काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबवण्याचे आव्हान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com