Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: डिकाॅस्‍ता यांच्या विरुद्ध कारस्थान; विरोधकांनी मुद्दाम सभागृह नाकारले

Yuri Alemao: आंबावली येथे आधार कार्ड अपडेट शिबिर संपन्न

Ganeshprasad Gogate

Yuri Alemao: केपे मतदारसंघात आमदार एल्टन डिकाॅस्‍ता चांगले काम करीत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत व त्‍यामुळेच त्यांच्या कामामध्ये ते व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनी केला.

ते आंबावली येथे आयोजित आधार कार्ड अपडेट शिबिराच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार एल्टन डिकाॅस्‍ता उपस्थित होते.

आंबावली पंचायत क्षेत्राचा काही भाग कुंकळ्‍ळी तर काही भाग केपे मतदारसंघात येत असून या पंचायत क्षेत्राचा विकास करताना कोणताही भेदभाव न करता सर्व ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण तसेच भूमिगत विजवाहिन्या घालण्यात येणार असल्याचे अालेमाव यांनी सांगितले.

केपे मतदारसंघात जास्तीत जास्त भाग ग्रामीण भागात येत असून या भागाचा विकास होणे गरजेचे असून त्यादृष्टीने आपण काम करीत असल्याचे एल्टन डिकाॅस्‍ता यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी शहरात येण्याची गरज भासू नये म्हणून काही सुविधा त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.

सध्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लोकांना बराच त्रास होत असल्याने ही सुविधा प्रत्येक पंचायतीत नेऊन त्या भागातील लोकांना एक सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आंबावली येथे हे शिबिर आठ दिवस चालणार असून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

ऐनवेळी शिबिराची जागा बदलली-

हे शिबिर आंबावली पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले होते. पण ऐनवेळी सदर सभागृह देण्यास टाळाटाळ केल्याने हे शिबिर अखेर प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आल्याचे डिकाॅस्‍ता यांनी सांगितले.

मुद्दामहून सदर सभागृह या कामासाठी देण्यात आले नसून कोणत्या कामासाठी आम्हाला नकार दिला याची शहानिशा आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT