Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Alert Update : गोव्यात विजांसह वादळी वाऱ्याचा इशारा; पुढील तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात यलो अलर्ट

Goa Weather yellow Alert: नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, मध्य तामिळनाडू व आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, मध्य तामिळनाडू व आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ट्रफ तयार झाला असून तो केरळ, तामिळनाडू आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरातून जात आहे. समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर हा ट्रफ पसरलेला आहे.

या हवामान बदलांमुळे पुढील तीन दिवस दक्षिण भारतात पावसाची शक्यता असून, गोव्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यात पावसाची शक्यता लक्षात घेता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यात पावसाचा तुटवडा कायम असल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्याने भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नजर आभाळाकडे लागली आहे.

३२ टक्के पावसाची तूट

राज्यात आतापर्यंत केवळ ७८ इंच पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत ११५ इंच पाऊस अपेक्षित होता. त्यामुळे राज्यात सुमारे ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. पावसाअभावी शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT