World Tribal Day 
गोवा

World Tribal Day: मडगाव रवींद्र भवनमध्ये राष्ट्रीय परिषद; गोव्यासहित बारा राज्यांतील अधिकाऱ्यांचा होणार सत्कार

अधिकाऱ्यांचा सत्कार; कार्यक्रमावर देशाची नजर

गोमन्तक डिजिटल टीम

World Tribal Day ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. गोव्यातही या दिवशी विविध आदिवासी संघटनांनी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

तसेच राज्य सरकारच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया आदिवासी संघटनेच्या सहयोगाने गोवा अनुसूचित जाती-जमाती आयोगाने केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, उटा संघटनेने आपला कार्यक्रम मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये बुधवार, ९ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केला असून त्यास कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन (गोवा) शाखेने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असून त्या परिषदेचे उद्‌घाटन गोवा अनुसूचित जाती-जमाती आयोगाने रवींद्र भवन, मडगाव येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात संध्याकाळी ५ ते रात्री ८ वा.दरम्यान होणार असल्याचे कळविले आहे.

या कार्यक्रमात गोव्यासहित बारा राज्यांतील आदिवासी अधिकाऱ्यांचा सत्कार होणार असल्याचे गोवा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉई संघटनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.

या दोन दिवसीय परिषदेतील जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन जनजाती आयोगाने केले आहे तर यात अभियोक्ता संचालनालय, पोलिस खाते, जिल्हाधिकारी खाती सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाचे यूट्यूबवरून प्रसारण होणार असल्याने भारतभरातील आदिवासींचे या कार्यक्रमावर लक्ष असणार आहे.

परिषदेला देशभरातून प्रतिसाद

कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रीय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अकरा राज्यांतील तीनशेहून अधिक प्रतिनिधी मडगाव येथे दाखल झाले आहेत. शेजारच्‍या महाराष्‍ट्रातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली भागातून लोक येत आहेत.

पारंपरिक वेशभूषेत गोव्याच्या दिशेने निघालेल्या प्रतिनिधींचे ग्रुप फोटो आदिवासी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT