No E-Visa At Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ई-व्हिसा सुविधाच नाही! पर्यटकांची मोठी गैरसोय

दाबोळी विमानतळावर सुविधा उपलब्ध, पण फ्लाईट्स मोपावर शिफ्ट केल्याने अडचण
Manohar International Airport Mopa
Manohar International Airport Mopa Dainik Gomantak

No E-Visa At Mopa Airport: गोव्याच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कारण पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (MIA) येथे ई-व्हिसा सुविधाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे परदेशी पर्यटकांची मोठी अडचण होणार आहे. कारण हा व्हिसा मिळत नसेल तर परदेशी पर्यटकांना विमानतळावरून बाहेर पडताच येणार नाही.

उलट त्यांना पुन्हा माघारी पाठवले जाण्याची शक्यता असते.

Manohar International Airport Mopa
Calangute News: कळंगुटमधील पबमध्ये IPS अधिकाऱ्याने काढली महिलेची छेड? पोलिस दलात खळबळ

विशेष म्हणजे, दाबोळी विमानतळावर ई-व्हिसाची ही सुविधा उपलब्ध आहे. पण दाबोळी विमानतळावरून अनेक फ्लाईट्स सध्या मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिफ्ट केल्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेक महत्वाच्या फ्लाईट्स सध्या मोपा विमानतळावरच उतरतात.

पण फ्लाईट्स शिफ्ट केल्या म्हणून पर्यटकांची सोय होण्याऐवजी पर्यटकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

एअर इंडियाच्या माहितीनुसार पुढील सूचना मिळेपर्यंत मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ई-व्हिसा सुविधा उपलब्ध नसेल. गोव्यात उतरण्यासाठी ई-व्हिसाची परवानगी केवळ दाबोळी विमानतळावर उपलब्ध आहे.

Manohar International Airport Mopa
Banastarim Bridge Accident: 'आम्हाला न्याय द्या’; बाणास्तरीतील मृतांच्या नातेवाईकांचे सरकारकडे साकडे; दिवाडी बेटावर शोककळा

जर ई-व्हिसा गरजेचा असलेला एखादा प्रवासी मोपा विमानतळावर आला तर त्याला त्याच फ्लाईटने परत पाठवले जाईल.

दरम्यान, मंगळवारी गोवा विधानसभा अधिवेशनात फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनीही हा मु्ददा उपस्थित केला होता.

मोपा विमानतळावर ई-व्हिसा बाबतची उपकरणेच नसल्याने येथे ही सुविधा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती घेऊ, असे सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com