Goa Won Best Fairs and Festivals State Award 
गोवा

Best Fairs and Festivals State: गोव्याच्या चिखलकाला महोत्सवाचे पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान

Kavya Powar

Goa won Best Fairs and Festivals State at The Economic Times Travel & Tourism Annual Conclave & Award

भारताच्या नैऋत्य किनार्‍यावरील सुंदर राज्य म्हणजे गोवा. गोव्याने नुकतेच दी इकॉनॉमिक टाईम्स ट्रॅव्हल अँड टूरिझम अॅन्युअल कॉन्क्लेव्ह आणि अवॉर्ड्समध्ये 'सर्वोत्कृष्ट मेळे आणि उत्सव राज्य' (Best Fairs and Festivals State) हा किताब जिंकला. ही मान्यता राज्याच्या समृद्ध संस्कृती दर्शविणाऱ्या वैविध्यपूर्ण उत्सव दिनदर्शिकेवर प्रकाशझोत टाकते.

या यशाचा महत्त्वाचा भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रेरणा, जे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी 'देखो अपना देश' उपक्रमाला सशक्त पाठिंबा देतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सक्षम नेतृत्वामुळे पर्यटन क्षेत्रातील विविध उपक्रमांना नेहमीच चालना मिळाली आहे.

गोव्याची संस्कृती आणि परंपरा साजरी करण्याच्या अनोख्या पद्धतीचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे माशेल, उत्तर गोव्यातील 'चिखलकाला' उत्सव. आषाढ महिन्याच्या अकराव्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला येणारा हा सण विठ्ठल रखुमाईच्या भक्तांसाठी अतिशय आध्यात्मिक आणि महत्त्वाचा आहे. चिखलकाला हा चिखल स्नान उत्सव म्हणूनही ओळखला जातो. हा उत्सव शेतकरी आणि धरती माता यांच्यातील दृढ बंधनाचे प्रतीक आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलकाला महोत्सव हा तीन दिवसीय उत्सव भक्ती आणि मनोरंजन यांचा संगम साधून वृद्धिंगत झालेला आहे. माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिरात गोव्याच्या शास्त्रीय आणि पारंपारिक संगीताचा कार्यक्रम यंदा प्रथमच आयोजित करण्यात आला.

यावेळी मंत्री रोहन खंवटे आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे हे यावर्षी चिखलकाल्यात सक्रियपणे सहभागी झाले. हा खेळ खेळणाऱ्या इतर नागरिकांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

चिखलकाला महोत्सव स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनला आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा खेचत आहे. गोव्याच्या सांस्कृतिक पर्यटन उपक्रमांमध्ये हा महोत्सव महत्त्वपूर्ण योगदान देतो.

चिखलकाला सारख्या उपक्रमांनी गोव्याला सांस्कृतिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्याच्या पर्यटनमंत्र्यांच्या दृष्टीने अनेकांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकच्या 350 व्या वर्षा निमित्त 19 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सहा शहरांमध्ये आगामी शिवजयंतीचा सोहळा राज्याचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा या प्रति गोव्याची बांधिलकी अधोरेखित करतो.

नरकासूर वध, आताचा श्रीकृष्ण विजयोत्सव, हे एक उल्लेखनीय परिवर्तन आहे ज्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. श्रीकृष्ण विजयोत्सव स्पर्धेला व्यापक प्रतिसाद मिळाला. त्रिपुरारी पौर्णिमा, दीपोत्सव सारखे उत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटनमंत्री खंवटे यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पर्यटनाची भरभराट या उपक्रमामुळे सुरू झाली आहे.

NoMoZo, कार्निव्हल फेस्टिव्हल आणि वीरभद्र फेस्टिव्हल आणि शिगमो फेस्टिव्हल यासारख्या कार्यक्रमांसह गोव्याची सण दिनदर्शिका, राज्याची समृद्ध सांस्कृतिक विविधता दर्शवते. दी इकॉनॉमिक टाईम्स ट्रॅव्हल अँड टुरिझम अॅन्युअल कॉन्क्लेव्हमध्ये नुकतीच मिळालेली मान्यता ही गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील भरभराटीचा दाखला आहे.

रोहन खंवटे यांसारख्या दूरदृष्टी लाभलेल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने, सांस्कृतिक पर्यटनात गोव्याचे यश केवळ त्याचा सांस्कृतिक वारसा जतन करत नाही तर वाढलेल्या पर्यटनाद्वारे आर्थिक विकासाला चालना सुद्धा देते.

गोव्याने आपला सांस्कृतिक वारसा चिखलकाल्या सारख्या कार्यक्रमांद्वारे साजरा करणे सुरू ठेवल्याने, राज्याची पर्यटन अर्थव्यवस्था शाश्वत वाढीसाठी सज्ज झाली आहे, जी एका चैतन्यदायी भविष्याचे वचन देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT