Goa women's team defeated Bihar's team in senior T20 cricket tournament  Dainik Gomantak
गोवा

Senior T20 Cricket Tournament: गोव्याच्या महिलांचा विजयी 'चौकार'

टी-20 क्रिकेट: बिहारला नमविले; सुनंदा, शिखाची शानदार कामगिरी

दैनिक गोमन्तक

पणजी: सुनंदा येत्रेकरची शानदार अष्टपैलू चमक, कर्णधार शिखा पांडे हिचा धारदार मारा या बळावर गोव्याच्या महिलांनी गुरुवारी सलग चौथ्या विजयाची नोंद केली. सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत त्यांनी बिहारला पाच विकेट आणि तब्बल 8.5 षटके राखून हरविले.

(Goa women's team defeated Bihar's team in senior T20 cricket tournament)

गोव्याचा हा सहा लढतीतील चौथा विजय ठरला, त्यामुळे त्यांचे 16 गुण झाले आहेत. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना शनिवारी (ता. 22) मध्य प्रदेशविरुद्ध होईल. गुवाहाटी येथील अमिनगाव क्रिकेट मैदानावर गोव्याने बिहारचा डाव अवघ्या 47 धावांत गुंडाळला, नंतर 11.5 षटकांत 5 विकेट गमावून सामना जिंकला.

बिहारच्या डावाला सुरुंग लावताना शिखाने 10 धावांत 3 विकेट टिपल्या. अनुभवी सुनंदाने 15 धावांच्या मोबदल्यात दोघींना माघारी धाडले.

नंतर सहाव्या षटकात गोव्याची 4 बाद 21 धावा अशी घसरगुंडी उडाली असता सुनंदाने नाबाद 16 धावा करत गोव्याच्या विजयाच मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

बिहार: १९.५ षटकांत सर्वबाद ४७ (अपूर्वा कुमारी ११, प्रगती सिंग १५, शिखा पांडे ४-१०-३, निकिता मळीक २-७-१, सुनंदा येत्रेकर ४-१५-२, पूर्वा भाईडकर ४-३-०, रुपाली चव्हाण ४-७-१, तेजस्विनी दुर्गड १.५-२-०) पराभूत वि. गोवा ः ११.१ षटकांत ५ बाद ४८ (पूर्वजा वेर्लेकर १२, संजुला नाईक ३, शिखा पांडे ०, विनवी गुरव १०, तेजस्विनी दुर्गड २, सुनंदा येत्रेकर नाबाद १६, श्रेया परब नाबाद ०, अपूर्वा ३-११, अपूर्वा कुमारी १-११, पी. प्रिया १-१२).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT