Goa Women's Premier League Dainik Gomantak
गोवा

Goa Women's Premier League: एमसीसी थेट अंतिम फेरीत, व्हेंचर इलेव्हनवर चार पराभवांची नामुष्की

विजेतेपदासाठी त्यांची गाठ सेलेस्ते सुपरवुमन्स व पणजी जिमखाना या एलिमिनेटर लढतीतील विजेत्या संघाशी पडेल.

किशोर पेटकर

Goa Women's Premier League: एमसीसी संघाने गुरुवारी रात्री सलग चौथा विजय नोंदवून गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची थेट अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांची गाठ सेलेस्ते सुपरवुमन्स व पणजी जिमखाना या एलिमिनेटर लढतीतील विजेत्या संघाशी पडेल.

पर्वरी येथील मैदानावर एमसीसी संघाने व्हेंचर इलेव्हनला शेवटच्या साखळी लढतीत तीन विकेट आणि नऊ चेंडू राखून हरविले. त्यांना गटात अग्रस्थान मिळाले. व्हेंचर संघावर सलग चार सामने गमावण्याची नामुष्की आली.

संक्षिप्त धावफलक

व्हेंचर इलेव्हन ः २० षटकांत ९ बाद १०४ (हर्षिता यादव १३, माधुरी अघाव २९, तरन्नुम पठाण २३, दीक्षा गावडे १०, तन्वीर शेख २-०-१७-१, गौतमी नाईक ४-०-१६-२, सुनंदा येत्रेकर ४-०-२४-२, सिद्धी सवासे ४-०-२०-२, श्रेया परब ४-०-१५-१) पराभूत

वि. एमसीसी ः १८.३ षटकांत ७ बाद १०७ (श्रेया परब २७, तेजस्विनी दुरगड १४, तन्वीर शेख नाबाद २६, सुनंदा येत्रेकर १९, तमन्ना निगम ३-०-२६-१, सावली कोळंबकर ४-०-२४-३).

स्पर्धेच्या साखळी फेरीनंतर

- एमसीसी संघाचे ४ विजय, ८ गुण, थेट अंतिम फेरीत

- सेलेस्ते सुपरवुमन्सचे ३ विजय व १ पराभव, ६ गुणांसह एलिमिनेटर लढतीस पात्र

- पणजी जिमखान्याचे २ विजय व २ पराभव, ४ गुणांसह एलिमिनेटर लढतीत

- जीनो ड्रॅगन्सचा १ विजय व ३ पराभवासह २ गुण, चौथा क्रमांक

- सलग ४ पराभवासह व्हेंचर इलेव्हन गटात शेवटच्या पाचव्या स्थानी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT