Goa Women's Premier League: जसिया फॉर्मात! सेलेस्ते सुपरवुमन्सची आगेकूच, जीनो ड्रॅगन्सचे आव्हान संपुष्टात

सेलेस्ते सुपरवुमन्स संघाने गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच राखली, तर जीनो ड्रॅगन्स संघाला साखळी फेरीतच गारद व्हावे लागले.
Goa Women's Premier League
Goa Women's Premier LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Women's Premier League: जम्मू-काश्मीरची आक्रमक शैलीची फलंदाज जसिया अख्तर हिचा गोव्यातील धडाकेबाज फॉर्म गुरुवारीही कायम राहिला. तिच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर सेलेस्ते सुपरवुमन्स संघाने तिसऱ्या विजयाची नोंद करून गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच राखली, तर सामना १० धावांनी गमावल्यामुळे जीनो ड्रॅगन्स संघाला साखळी फेरीतच गारद व्हावे लागले.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर एलिमिनेटर लढतीसाठी पात्र ठरण्यासाठी जीनो ड्रॅगन्स संघाला सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक होते, पण विजयासाठी प्रयत्न करताना त्यांनी सहा विकेट २० धावांत गमावल्या. त्यामुळे तिसऱ्या पराभवामुळे त्यांचे दोन गुण कायम राहिले. चार गुणांसह पणजी जिमखाना संघ गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि एलिमिनेटर लढतीसाठी पात्र ठरला. सेलेस्ते सुपरवुमन्सने चार लढतीत तिसरा विजय नोंदवून सहा गुणांसह घोडदौड राखली.

डावाची धमाकेदार सुरवात

सेलेस्तेच्या डावाची सुरवात धमाकेदार झाली. जसिया हिने सलग दुसरे अर्धशतक करताना विनवी गुरव हिच्यासमवेत संघाला १०.४ षटकांत ९६ धावांची सलामी दिली. त्यामुळे सेलेस्ते संघाला ४ बाद १७४ धावा करणे शक्य झाले. जसियाने ३६ चेंडूंत नऊ चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. विनवी ५० धावांवर नाबाद राहिली. तिने ५० चेंडू खेळताना तीन चौकार मारले.

Goa Women's Premier League
GWPL: दहशतवादाला भीक न घालता 'ती'ने जपले क्रिकेट प्रेम; जम्मू-काश्मीरच्या लेकीची गोव्यात शतकी खेळी

जीनो ड्रॅगन्सचे प्रयत्न तोकडे

किरण नवगिरे व पूर्वजा वेर्लेकर यांनी जीनो ड्रॅगन्सला ४० धावांची सलामी दिली. नंतर पूर्वजाने कर्णधार अनुजा पाटील हिच्यासमेवत दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली, मात्र विजयासाठी धावगती वाढविण्याचा दबाब जीनो ड्रॅगन्सला झेपला नाही. ३ बाद १४३ वरून त्यांचा डाव ९ बाद १६३ असा कोसळला. अखेरीस त्यांना निर्धारित २० षटकांत ९ बाद १६४ धावाच करता आल्या.अनुजाने ४४ चेंडूंत १० चौकार व एका षटकारासह ६६, तर पूर्वजाने २५ चेंडूंत सहा चौकार व एका षटकाराच्या साह्याने ४० धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

सेलेस्ते सुपरवुमन्स ः २० षटकांत ४ बाद १७४ (जसिया अख्तर ६८, विनवी गुरव नाबाद ५०, सायली लोणकर २८, पूर्वा भाईडकर १३, तनया नाईक ४-०-३४-१, तनिष्का सेन ४-०-२२-२) वि. वि. जीनो ड्रॅगन्स ः २० षटकांत ९ बाद १६४ (किरण नवगिरे २८, पूर्वजा वेर्लेकर ४०, अनुजा पाटील ६६, तनया नाईक नाबाद १०, प्रीती यादव ४-०-३७-१, पूर्वा भाईडकर ४-०-२४-१, सायली लोणकर ४-०-४३-१, पूजा निषाद ४-०-३४-३, स्वीटी परब ४-०-२६-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Griha Aadhar Scheme
Goa Under 19 Women Cricket
Bangladesh Premier League Suspended
Assam Premier League Viral Cricket Fight latest video
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com