Goa Women Workers X
गोवा

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

Goa Women Workers: दुकाने आणि आस्‍थापना कायद्याचा अभ्‍यास करून राज्‍यातील महिला कामगारांसाठी कामाची निश्‍चित वेळ करण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी काही महिन्‍यांपूर्वी सांगितले होते.

Sameer Panditrao

पणजी: गोवा दुकाने आणि आस्‍थापना कायदा, १९७३ नुसार राज्‍यातील महिला कामगारांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी वेळ सरकारने निर्धारित केली आहे. शिवाय महिला कामगारांच्‍या सुरक्षितेबाबत योग्‍य त्‍या उपाययोजना राबविण्‍याच्‍या सूचनाही संबंधितांना दिल्‍या आहेत.कामगार खात्‍याच्‍या अवर सचिव अमालिया पिंटो यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

दुकाने आणि आस्‍थापना कायद्याचा अभ्‍यास करून राज्‍यातील महिला कामगारांसाठी कामाची निश्‍चित वेळ करण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्‍यांपूर्वी सांगितले होते.

त्‍यानुसार महिला कामगारांसाठी कामगार खात्‍याने आता सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी वेळ निश्‍चित केली आहे. याशिवाय महिला कामगारांची सुरक्षा केंद्रस्‍थानी ठेवून त्‍यासंदर्भात आवश्‍यक त्‍या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही खात्‍याने केल्‍या आहेत.

सुरक्षेसाठी राबवा ‘या’ उपाययोजना

महिला कामगार असलेली दुकाने आणि आस्‍थापनांनी महिलांसाठी त्‍यांच्‍या निवासस्‍थानापासून ते कामाच्‍या ठिकाणापर्यंत वाहतूक व्‍यवस्‍था करावी.

ज्‍या दुकाने किंवा आस्‍थापनांमध्‍ये महिला कामगार आहेत, तेथे सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांची व्‍यवस्‍था करावी.

महिला कामगारांना हीन दर्जाची वागणूक मिळणार नाही, याची दक्षता घेऊन त्‍यांच्‍यासाठी कामाच्‍या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

Viral Video: 'दुचाकी की चालतं-फिरतं मृत्यूचं जाळं', चिमुकल्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बापाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

Goa Panchayat Construction : कचरा कंत्राटदारांवर आता 'जीपीएस'ची नजर; विकसित गोवा पंचायत संमेलनात मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन!

Lakshmi Narayan Rajyog: "बुध-शुक्राची जुळली युती, लक्ष्मी नारायण योगाची प्राप्ती!" परदेश प्रवासासोबत अचानक धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT