Goa Government Job: गोव्यात 45,000 पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; DRDA, GSPCB ची जाहीरात प्रसिद्ध, वाचा संपूर्ण माहिती

Goverment Job 2025: गोवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (GSPCB) यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ३० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. उत्तर गोवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (GSPCB) यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ३० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये काही पदांची भरती कंत्राटी तत्वावर, तर काही पदांची भरती कायमस्वरूपी स्वरूपात करण्यात येणार आहे.

उत्तर गोवा DRDAमार्फत एकूण १९ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक १२ जागा गट व्यवस्थापक (ब्लॉक मॅनेजर – BMs) पदासाठी आहेत.

ही सर्व पदे एका वर्षाच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार असून १४ ते १८ जुलै या कालावधीत थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. विविध ग्रामीण विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही भरती होणार आहे.

Goa Government Job
Goa Ferryboat: गोमंतकीयांसाठी खुशखबर! राज्‍यात नवीन 5 फेरीबोटी लवकरच येणार; 2 बोटी डिसेंबरपर्यंत सेवेत

दुसरीकडे, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात ११ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ५ पदे कनिष्ठ पर्यावरण अभियंता या पदासाठी असून ही सर्व पदे कायमस्वरूपी स्वरुपाची असतील.

इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जुलै २०२५ आहे. या भरतीत राज्य प्रकल्प व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक आणि एचआर असोसिएट अशा तीन प्रकारच्या एकूण सात पदांचा समावेश आहे.

Goa Government Job
Goa Forward: गोवा फॉरवर्डची ‘आमचो आवाज विजय’ मोहीम! जाणून घेणार लोकांचे प्रश्‍न; पेडण्यातून होणार सुरुवात

तसेच, जिल्हा समन्वयकाच्या २ पदांसाठी आणि एचआर असोसिएटच्या एका पदासाठी देखील भरती होणार आहे. सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पदांपैकी राज्य प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराकडे ग्रामीण व्यवस्थापन, संगणक शास्त्र, वाणिज्य किंवा व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी असणे बंधनकारक आहे. तसेच या पदासाठी किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला मासिक ५०,००० रुपये वेतन दिले जाईल.

Goa Government Job
Goa Forward: गोवा फॉरवर्डची ‘आमचो आवाज विजय’ मोहीम! जाणून घेणार लोकांचे प्रश्‍न; पेडण्यातून होणार सुरुवात

यासाठी इच्छुक उमेदवारांची नोंदणी १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे, तर दुपारी २.३० वाजता थेट मुलाखती घेतल्या जातील. जिल्हा समन्वयक आणि एचआर असोसिएट पदांसाठी १६ जुलै रोजी मुलाखती होणार आहेत, तर गट व्यवस्थापक (ब्लॉक मॅनेजर) पदासाठी १८ जुलै रोजी मुलाखती पार पडतील.

Goa Government Job
Goa Ferryboat: गोमंतकीयांसाठी खुशखबर! राज्‍यात नवीन 5 फेरीबोटी लवकरच येणार; 2 बोटी डिसेंबरपर्यंत सेवेत

जिल्हा समन्वयक आणि एचआर असोसिएट पदांसाठी मासिक ४०,००० रुपये, तर गट व्यवस्थापक पदासाठी मासिक ३०,००० रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.भरती प्रक्रिया, पात्रता अटी आणि इतर सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.goa.gov.in/ ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात चार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सहाय्यक कायदा अधिकारी, शास्त्रीय सहाय्यक (मायक्रोबायोलॉजी), एमटीएस (मल्टी टास्किंग स्टाफ) आणि लॅब अटेंडंट अशा प्रत्येकी एका जागांचा समावेश आहे.

या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाबाबतची सविस्तर माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://goaspcb.gov.in/ पाहावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com