Goa woman harassment news Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील तरुणीवर उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार? तरुणीने व्हिडिओतून केले गंभीर आरोप

Uttar Pradesh Crime News: तरुणी थोड्या काळानंतर तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. तरुणाने तिच्याकडून पाच लाख रुपये घेतले आणि ते त्याच्या व्यवसायावर खर्च केले.

Pramod Yadav

उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप गोव्यातील तरुणीने केला आहे. याबाबतची माहिती तरुणीने व्हिडिओद्वारे दिली आहे. स्थानिक तरुणाने लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले यानंतर त्याच्या मित्रांनी देखील लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तरुणीने केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्याचे तिने म्हटले आहे.

हिंदुस्तान या हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या अतिप्रसंगाचे कथन एका व्हिडिओद्वारे केले आहे. गोव्यातील तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणीने सरायमाररेज पोलिस स्टेशन परिसरात वास्तव्यास होती. याच परिसरातील एक तरुण तिच्या संपर्कात आला. तरुणाने तरुणीच्या घराजवळच एक खोली भाड्याने घेतली.

दोघांमध्ये जवळीक वाढत गेली, मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तरुणी थोड्या काळानंतर तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. तरुणाने तिच्याकडून पाच लाख रुपये घेतले आणि ते त्याच्या व्यवसायावर खर्च केले, असा ओराप तरुणीने केला आहे.

यानंतर तरुणाचा वागणे बदलल्याचे तरुणीच्या लक्षात आले. दरम्यान तरुणीने त्याला लग्न करण्याचा आग्रह धरला. तरुण लग्नासाठी टाळाटाळ करु लागला. तरुणीला संशयित तरुणाचे मित्र इतर नातेवाईक ओळखत होते. तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी गाठून संशियत तरुणाच्या मित्रांनी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

पोलिस स्थानकात जात असताना देखील अज्ञात ठिकाणी तिला घेऊन जात तिला मारहाण केली तसेच, धमकावल्याचे तरुणी व्हिडिओत सांगत आहे. तरुणीने घडलेले सगळे प्रकरण पोलिसांना लेखी स्वरुपात देऊन तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तपासास सुरुवात केलीय, पोलिसांनी संशयिताचा घरी शोध घेतला मात्र, तो घरी नसल्याचे आढळून आले, अशी माहिती तरुणीने व्हिडिओद्वारे दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bull Attack in Majorda: माजोर्डा येथे बैलाच्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू, काहीजण जखमी; कोलवा पोलिसांकडून तपास सुरु

Air India Flight: एअर इंडियाच्या विमानात 'हायजॅक'चा थरार! प्रवाशाने कॉकपिटमध्ये घुसण्याचा केला प्रयत्न; बंगळूरु-वाराणसी विमानात गोंधळ

Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

SCROLL FOR NEXT