37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

National Games Goa 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे अर्धशतक, प्रथमच 50 पदकांची कमाई

Pramod Yadav

National Games Goa 2023: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान गोव्याने आत्तापर्यंत 50 पदकांची कमाई केली आहे. राज्याने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदकांची कमाई केली आहे.

गोव्याने सोमवारी लगोरी, योगा यात दोन पदकांची कमाई केली , यासह राज्याची एकूण पदक संख्या 50 एवढी झाली आहे. यजमान गोव्यासाठी हे मोठे यश मानले जात आहे.

गोव्याला आत्तापर्यंत 12 सुवर्ण, 12 रौप्य आणि 26 कांस्य पदकं अशी एकूण 50 पदकांची कमाई राज्याने केली आहे.

पदक तालिकेत 199 पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्राने 68 सुवर्ण, 63 रौप्य आणि 68 कांस्य पदकांची कमाई केली आहे. तर, हरियाणा राज्याने 50 सुवर्ण, 37 रौप्य आणि 53 कांस्य अशी एकूण 140 पदकांची कमाई केली आहे.

यजमान गोव्याची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक कमाई सुरु असून, राज्यातील मंत्री आणि क्रीडा प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, सर्व सहभागी खेळडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, येत्या 09 नोव्हेंबरपर्यंत राज्यात क्रीडा स्पर्धांचा उत्सव सुरु राहणार आहे. गोवा अजून काही पदकांची कमाई करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गुरुवारी क्रीडा स्पर्धांचा समारोप होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim News: डोंगर उद्‌ध्वस्त करू देणार नाही! थिवीवासीयांची ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी' विरुद्ध वज्रमूठ

Rashi Bhavishya 7 October 2024: आनंदी आनंद गडे! सर्व कामे लागणार चुटकीसरशी मार्गी; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Sunburn Festival 2024: कामुर्ली ग्रामस्थांच्या लढ्याला यश! 'सनबर्न'चा प्रस्ताव सर्वांनुमते फेटाळला

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त कामांचा धूमधडाका! '18 जून'सह तीन मार्गांचे काम लवकरच सुरु होणार

Goa Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीचे देवीचे मंदिर कोणते माहितीये?

SCROLL FOR NEXT