Goa Beaches Sand Erosion Dainik Gomantak
गोवा

Goa Beaches Sand Erosion: किनाऱ्यावरील वाळूची धूप रोखण्यासाठी गोवा अवलंबणार नेदरलँडचे मॉडेल

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्चचे सहकार्य घेणार

Akshay Nirmale

Goa will apply the Dutch Model against Erosion of Sand on Beaches: सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा जगप्रसिद्ध आहे. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरणीय बदलांमुळे गोव्यातील किनारपट्टीवरील वाळुची मोठ्या प्रमाणात धूप होत चालली आहे. त्याला आळा बसावा यासाठी आता गोवा सरकार नेदरलँडचे मॉडेल अवलंबणार आहे.

राज्य सरकारच्या अखत्यारीतील गोवा कोस्टल अँड एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेंट सोसायटी यासाठी नेदरलँडच्या डी झँड मोटर (द सँड मोटर) या नावाने ओळखल्या जाणार्‍या तंत्राचा वापर करणार आहे.

त्यातून किनारपट्टीवर वाळूची धूप रोखण्याच्या डच मॉडेलच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्या म्हणण्यानुसार, सोसायटीने नेदरलँडच्या एजन्सीसह समुद्रकिनाऱ्यावरील भागांच्या पोषणासाठी (सँड मोटर) प्रक्रिया सुरू केली आहे आणि प्राथमिक अभ्यासासाठी तज्ज्ञ शास्त्रज्ञांना गोव्याला भेट देण्याची विनंती केली आहे.

हे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) आणि नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च (NCCR) यांच्या सहकार्याने केले जाणार आहे.

गोवा सरकारने डेल्टरेस या नेदरलँडच्या स्वतंत्र ज्ञान संस्थेशी संपर्क साधला आहे. ही संस्था पाणी आणि भूपृष्ठ क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपायांवर काम करते.

या तंत्रात ताज्या वाळूचा ढीग सहसा खोल समुद्रातून आणणे आणि किनार्‍यालगत एक कृत्रिम द्वीपकल्प तयार केला जातो. नंतर लाटा आणि वाऱ्याच्या नैसर्गिक झोतासमवेत ही वाळू धूप झालेल्या भागाकडे जात राहते.

नेदरलँड्समध्ये 2011 मध्ये 21.5 दशलक्ष घनमीटर वाळू वापरून हेगजवळील किनार्‍याजवळ एक मोठा द्वीपकल्प बांधण्यात आला, त्यावेळी हे तंत्र यशस्वीपणे राबवले होते.

निसर्गपुरक बांधकामांच्या तत्त्वांचे पालन करून हा कृत्रिम वाळू किनारा तयार केला आहे. समुद्रातील प्रवाह, वारा आणि लाटा हळूहळू किनारपट्टीवर आणि ढिगाऱ्यांमध्ये वाळू पसरत आहेत. किनारपट्टी दीर्घकाळासाठी मजबूत करणे आणि विश्रांतीसाठी आणि निसर्गासाठी आकर्षक क्षेत्र तयार करणे, हा यामागचा उद्देश आहे.

सँड मोटर हा एक अनोखा प्रयोग आहे. यात समुद्राच्या पाण्याचा योग्य वापर केला जातो. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाळू जमा केल्याने करतो.

राज्याच्या पर्यावरण संचालक स्नेहा गित्ते यांनी डेल्टरेस ला जूनमध्येच पत्र लिहून विनंती केली होती की, "गोव्यातील धूप नियंत्रित करण्यासाठी वाळूच्या मोटर तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याच्या शक्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी गोव्याला अभ्यास भेटीसाठी वैज्ञानिकांच्या नावासह योग्य तारीख कळवावी.

दरम्यान, नेदरलँडमध्ये हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. त्यातून किनाऱ्यांची धुप वाचली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT