Goa Widow Pension Dainik Gomantak
गोवा

Goa Widow Pension: 40,744 विधवांना पेन्‍शनचा आधार, 31 ते 50 वयोगटातील महिलांचा आकडा वाढता; व्‍यसनाधिनतेमुळे अनेक संसार उद्धवस्‍त

Goa Widow Beneficiaries: विविध कारणांमुळे राज्‍यात ३१ ते ५० वयोगटातील विधवा महिलांची संख्‍या वाढत चाललेली असून, सद्यस्‍थितीत समाज कल्‍याण खात्‍याच्‍या विधवा पेन्‍शन योजनेचा ज्‍या ४०,७४४ महिला लाभ घेत आहेत

गोमंतक ऑनलाईन टीम

सिद्धार्थ कांबळे

पणजी: विविध कारणांमुळे राज्‍यात ३१ ते ५० वयोगटातील विधवा महिलांची संख्‍या वाढत चाललेली असून, सद्यस्‍थितीत समाज कल्‍याण खात्‍याच्‍या विधवा पेन्‍शन योजनेचा ज्‍या ४०,७४४ महिला लाभ घेत आहेत, त्‍यातील ७,०५६ महिला या गटातील असल्‍याचे खात्‍याच्‍या आकडेवारीतून समोर आले आहे. योजनेतील दुरुस्‍तीमुळे या संख्‍येत आणखी तीन ते चार हजार महिलांची वाढ होण्‍याची शक्‍यता समाज कल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सोमवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्त केली.

जागतिक विधवा दिनानिमित्त राज्‍यातील परिस्‍थितीचा आढावा घेतला असता, सद्यस्‍थितीत समाज कल्‍याण खात्‍याच्‍या विधवा पेन्‍शन योजनेचा ४०,७४४ महिला लाभ घेत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. याआधी या योजनेअंतर्गत विधवा महिलांना प्रत्‍येक महिन्‍याला १,५०० रुपयांची पेन्‍शन देण्‍यात येत होती. परंतु, सरकारने योजनेत दुरुस्‍ती करीत विधवांसाठीच्‍या पेन्‍शनमध्‍ये वाढ केली.

याबाबत बोलताना, ‘‘याआधी विधवा महिलांना १,५०० रुपयांची पेन्‍शन मिळत होती. पण, सरकारने काही महिन्‍यांपूर्वी योजनेत दुरुस्‍ती करीत ज्‍यांच्‍या मुलांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आहे, त्‍यांना प्रत्‍येक महिन्‍याला चार हजार रुपये, तर मुलांचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक असलेल्‍यांना २,५०० रुपयांचे अर्थसहाय्‍य देण्‍याचे निश्‍चित केले.

मुलांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असलेल्‍या २,८९६ महिलांना सध्‍या चार हजार रुपयांची पेन्‍शन मिळत आहे. पण, पुढील काळात त्‍यात तीन ते चार हजार महिलांची भर पडू शकते. ५१ पेक्षा अधिक वयोगटातील विधवा महिलांना २,५०० रुपयांची पेन्‍शन देण्‍यात येत आहे’’, असे मंत्री सुभाष फळदेसाई म्‍हणाले.

दरम्‍यान, ३१ ते ५० या वयोगटातील महिलांवर विधवा होण्‍याची वेळ येण्‍यास वाढती व्‍यसनाधीनता हेच प्रमुख कारण असल्‍याचे आणि ग्रामीण भागच यात आघाडीवर असल्‍याचे आतापर्यंतच्‍या अभ्‍यासातून स्‍पष्‍ट झालेले आहे.

मुलांच्‍या शिक्षणाचा विचार करूनच निर्णय : मंत्री फळदेसाई

‘‘विधवा पेन्‍शन योजनेत काहीच महिन्‍यांपूर्वी दुरुस्‍ती करण्‍यात आलेली आहे. त्‍यानुसार खात्‍याकडे आलेल्‍या अर्जांनुसार ज्‍यांच्‍या मुलांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना मासिक चार हजार रुपयांची पेन्‍शन देण्‍यात येत आहे. २१ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्‍या मुलांच्‍या माता ३१ ते ५० वयोगटातील असतात. शिवाय अशा मुलांचे शिक्षणही सुरू असते. याचा विचार करूनच योजनेत दुरुस्‍ती केली आहे. खात्‍याकडे या योजनेच्‍या जागृतीवर भर देण्‍यात आलेली आहे’’, असेही मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

विधवा पेन्‍शनचा लाभ घेत असलेल्‍या महिला

वय नोंदवलेले नाही : ७४८

१८ ते ३० : १२२

३१ ते ५० : ७,०५६

५१ पेक्षा अधिक : ३२,८१८

एकूण : ४०,७४४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT