Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: आला हिवाळा, आरोग्य सांभाळा! राज्यात पहाटे जाणवते थंडी, किमान तापमान 20 अंशांवर

Goa Weather Update: थंड वारे अधिक प्रभावी झाल्याने राज्यात पहाटे थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील घाटलगतच्या भागात तर अधिकच थंडी वाजते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: थंड वारे अधिक प्रभावी झाल्याने राज्यात पहाटे थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील घाटलगतच्या भागात तर अधिकच थंडी वाजते.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असून किमान तापमानाचा पारा २० अंशांवर आला असून सामान्य किमान तापमानाच्या तुलनेत २ अंशांनी घट झाली आहे तर कमाल तापमानाच्या तुलनेत २.३ अंशांनी घट नोंदविण्यात आली असून पुढील काही दिवस पहाटे धुक्याची चादर कायम राहणार असल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात सर्वसामान्यपणे उष्ण वातावरण मोठ्या प्रमाणात असते; परंतु सध्या थंडीचे दिवस असल्याने स्वेटर आणि ऊबदार कपडे, वाहनांवरून ये-जा करण्यासाठी लागणारे जॅकेट, टोपी आदींची विक्री वाढली आहे. थंडीपासून बचावासाठी काही भागात नागरिक शेकोटी पेटवून ऊब घेतानादेखील दिसत आहेत.

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

वाढत्या थंडी आणि हवामान बदलांमुळे थंडी, ताप आदी प्रकार वाढत आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, कोमट पाणी प्यावे, तेलकट, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa News: आग लागलेली असतानाच लुथरा बंधूंनी थायलंडचे केले तिकीट बुक

SCROLL FOR NEXT