Weather Update Dainik Gomantak
गोवा

Weather Update: गोव्यात तापमानाचा पारा घसरला; इतक्या अंशांनी घट

पुढील चार ते पाच दिवस राज्यात काही भागांत धुके दाटण्याची शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Weather Update: देशातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठला आहे.  पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. राज्यातील किमान तापमानात नीचांकी घट झाली असून मंगळवारी पारा 17.2 अंशांवर पोहोचला होता. यंदा हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वांत नीचांकी किमान तापमान आज नोंदविण्यात आले.

गेल्या पंधरवड्यात कधी थंडी, तर कधी उष्मा, असा प्रकार सुरू होता. मात्र, पुढील चार ते पाच दिवस राज्यात काही भागांत धुके दाटण्याची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. पणजी येथे सामान्य किमान तापमानापेक्षा 2.9 अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे 3.8 अंश सेल्सिअस कमी तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात यापूर्वी सर्वाधिक कमी तापमान 3 जानेवारी 1991 रोजी 14.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते.

देशातील अनेक भागात तापमानाचा (Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर येत्या मंगळवारी थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. सफदरगंजमध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT