Goa Board Exam 2023: दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 'असे' आहे वेळापत्रक...

प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही जाहीर
Goa Board Exam Date Announced
Goa Board Exam Date AnnouncedDainik Gomantak

Goa Board Exam 2023: गोवा बोर्डाच्या 2023 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. GBSHSE च्या पत्रकानुसार SSC परीक्षा 1 ते 8 एप्रिल तर HSSC परीक्षा 15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत होणार आहे. gbshse.in वर जाहीर या तारखा आणि परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, SSC, HSSC परीक्षांसाठी GBSHSE बोर्ड परीक्षेच्या तारखा अधिकृत वेबसाइटवर एकत्र प्रसिद्ध केल्या जातात. विद्यार्थी गोवा बोर्ड परीक्षा डेट शीट PDF ऑनलाइन तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

Goa Board Exam Date Announced
Anjuna Crime: हणजुणात दोघांवर खुनी हल्ला, 5 बिहारींना अटक

बारावीच्या परीक्षेच्या तारखा...

तारीख विषय

15 मार्च 2023 - इंग्रजी

17 मार्च 2023 - अकाऊंटन्सी, भौतिकशास्त्र, इतिहास

18 मार्च 2023 - राज्यशास्त्र

20 मार्च 2023 - गणित

21 मार्च 2023 - रसायनशास्त्र, बिझनेस स्टडीज

24 मार्च 2023 - कॉम्प्युटर सायन्स

27 मार्च 2023 - जीवशास्त्र, अर्थशास्त्र

29 मार्च 2023 - हिंदी

दहावीच्या परीक्षेच्या तारखा...

तारीख विषय

1 एप्रिल 2023 - पहिली भाषा

3 एप्रिल 2023 - तिसरी भाषा

5 एप्रिल 2023 - गणित

10 एप्रिल 2023 - द्वितीय भाषा

12 एप्रिल 2023 - विज्ञान

15 एप्रिल 2023 - सामाजिक विज्ञान, इतिहास आणि पॉलिटीकल सायन्स

Goa Board Exam Date Announced
Pilerne Fire: आगीवर नियंत्रण मिळवायला रात्री साडे दहा वाजणार; 40 बंब घटनास्थळी

प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही जाहीर

GBSHSE ने प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत, SSC च्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून घेतल्या जातील तर HSSC च्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 फेब्रुवारीपासून आणि NSQF प्रात्यक्षिक परीक्षा 7 फेब्रुवारीपासून सुरू होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com