Weather Update Dainik Gomantak
गोवा

Weather Update: गोमंतकीयांना उन्हाचे चटके! तापमानाचा पारा 35 अंशांवर, पुढील काही दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता

Goa Weather Update: गोव्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : गोव्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागते. त्यामुळे नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवस राज्यातील तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नसून हवामान कोरडे राहील, असा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला आहे.

शनिवारी राज्यात कमाल तापमानाची नोंद ३५.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके करण्यात आले. सामान्य तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात २.१ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसा उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून दुपारच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, शनिवारी राज्यातील कमाल आर्द्रतेची नोंद ९२ टक्के करण्यात आली. ही आर्द्रता सामान्य पातळीपेक्षा १६ टक्क्यांनी अधिक आहे. तापमानासोबतच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्याने उकाड्यात भर पडत आहे. आता पावसाची शक्यता नसून कोरड्या हवामानासह उष्णतेची स्थिती कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

ST Political Reservation: सरकारनंतर 'मिशन'ही सुप्रीम कोर्टात, 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी न्यायालयीन लढा आणखी तीव्र

नरकासुरांचा उच्‍छाद! ज्‍येष्‍ठ नागरिक हवालदिल; मध्‍यरात्रीपर्यंत गोंगाट, न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाच्या अंमलबजावणीपूर्वीच ध्वनिप्रदूषणाचा कळस

Diwali Horoscope: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 4 राशींचे नशीब चमकणार! नोकरी, शिक्षण अन् करिअरमध्ये मिळणार मोठे यश; घरात येणार आनंदाची बातमी

Shami Tree: 400 जणांनी प्राण दिले, पण शमीवृक्ष तोडू दिला नाही! पांडवांच्या शस्त्रांशीही जोडलेला आहे या पवित्र झाडाचा इतिहास

SCROLL FOR NEXT