Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update :आज-उद्या राज्यात ‘रेड अलर्ट’; मुसळधार पावसाची शक्यता

Goa Weather Update : मात्र, शेतीसाठी पोषक वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update :

पणजी, भारतीय हवामान खात्याने रविवारी आणि सोमवारी राज्यात पावसाचा जोर असेल, असा इशारा दिला आहे.

तांत्रिक भाषेत त्यांनी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे रविवारी या सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडताना किंवा पाणथळ जागी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा पावसाळा टक्केवारी ओलांडेल, असा अंदाज सुरवातीपासूनच व्यक्त केला जाऊ लागला आहे. बहुतांशपणे पाऊस रात्रीचा पडत असल्याने मध्यंतरी पावसाने गेल्या वर्षीची टक्केवारीची सरासरी ओलांडल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते.

त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भातशेतीसाठी पोषक असे पावसाळी वातावरण आहे, असे दिसून येत आहे. पावसाने आठवडाभराने

काही दिवसांची विश्रांती घेतली तर भातशेती पोसण्यास मदत होईल, असे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. पावसाची संततधार अशी या पावसाळी हंगामात अनुभवता आलेली नाही. पाऊस जोरदारपणे पडतो; पण तेवढीच विश्रांतीही घेतो.

त्यामुळे उंच भागातील शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी डोंगर माथ्यावरील झरे खळाळून वाहण्यास अद्याप सुरवात झालेली दिसत नाही. पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, दरडी कोसळणे अशा गोष्टी राज्यभरात घडत आहेत. त्यातच मालपे येथे वाहतूक सुरू असताना गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दरड आणि संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

पावसाळी पर्यटनास प्रारंभ

मध्यंतरी धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास मुभा; पण पाण्यात उतरण्यास बंदी अशा विविध विषयांत राज्यातील पावसाळी पर्यटन अडकले होते. मात्र, आता पावसाळी पर्यटन पुन्हा जोर धरू लागले आहे. देशी पर्यटकांनी पावसाळ्याच्या निमित्ताने गोव्याकडे खास करून ग्रामीण भागाकडे पावले वळविल्याचेही दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

IFFI 2024 मध्ये लोकसंस्कृतीद्वारे देशाची एकता, अखंडतेचे दर्शन! दवर्लीत होणार खुले फिल्म स्क्रिनिंग

Nithya Menen At IFFI: 'तरीही त्या व्यक्तीसोबत काम करणे कर्तव्यच'; अभिनेत्री नित्या मेनन सहकलाकारांबद्दल नेमके काय म्हणाली..

SCROLL FOR NEXT