Panaji Rain Update : राज्‍यात मुसळधार पावसामुळे पडझड, अपघात, बत्ती गुल

Panaji Rain Update : पुढील दोन दिवस ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमाऱ्यांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्‍यात आला आहे. १२ जूनला ‘एलो अलर्ट’ तर १५ जूनला ‘ग्रीन अलर्ट’ जारी केला आहे.
Panaji Rain Update
Panaji Rain Update Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Rain Update :

पणजी, गेल्‍या दोन दिवसांपासून राज्‍यात पडत असलेल्‍या जोरदार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबर झाडे उन्मळून पडली, वीज खंडित झाली, वाहतुकीची कोंडी आणि अपघातही घडले.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस (ता. १० व ११ जून) ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्‍यान, गेल्या २४ तासांत सरासरी २ इंच पाऊस पडला आहे.

पुढील दोन दिवस ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमाऱ्यांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देण्‍यात आला आहे. १२ जूनला ‘एलो अलर्ट’ तर १५ जूनला ‘ग्रीन अलर्ट’ जारी केला आहे.

Panaji Rain Update
Yellow Alert In Goa: गोव्यात नऊ जूनपर्यंत यलो अलर्ट; मच्छीमारांना किनारी भागात न जाण्याचा सल्ला

काय घडले?

मोरजी : रस्ते गेले पाण्याखाली. काही ठिकाणी घरे, दुकानांमध्‍ये शिरले पाणी.

फोंडा : कुर्टी, बेतोडा-बोरी मार्गावर अपघातांत दोघे जखमी; झाडांची पडझड

काणकोण : १५ वीजखांब पडले मोडून. खात्याचे सुमारे ५ लाखांचे नुकसान.

वाळपई : झाडांची मोठी पडझड. रस्त्यांवर पाणीच पाणी. वीजेचा लपंडाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com