पणजी: राज्यात यंदा मे महिन्यातच मान्सूनचे आगमन झाले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची बरसातही झाली, परंतु यंदा सामान्य पावसाच्या तुलनेत जून महिन्यात १३ टक्क्यांनी पाऊस कमी नोंदला आहे. सर्वसामान्यपणे जूनमध्ये सरासरी ९१४ मि.मी. म्हणजेच ३५.९८ इंच पावसाची नोंद अपेक्षित असते, पंरतु यंदा आतापर्यंत ७९२.३ मिमी. म्हणजेच ३१.१९ इंच पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात तुरळक आणि मध्यम पावसाची नोंद करण्यात आली, परंतु राज्यातील काही भागात मात्र मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे.
२४ तासांत राज्यात १७.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ४२ मिमी. इतकी पावसाची नोंद फोंडा येथे झाली. त्याखालोखाल सांगे ३३ मिमी., धारबांदोडा ३२ मिमी., पणजी १६.४ मि.मी. नोंद करण्यात आली आहे. पुढील ५ दिवस राज्यात मध्यम पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागील पाच वर्षांतील जूनमधील पाऊस
वर्ष मि.मी. इंच
२०२० - १०४२, ४१.०२
२०२१- ९५४, ३७.५५
२०२२- ८३०- ३२.६७
२०२३- ६५५, २५.७८
२०२४- ९४०, ३७
जून महिन्यातील पाऊस सरासरी पेक्षा घट
राज्यात सरासरी पडलेला पाऊस ३१.१९ इंच. १३.३ टक्के
उत्तर गोवा ३६.७६ इंच. १४.६ टक्के
दक्षिण गोवा ३५.२९ इंच. १२.१ टक्के
सर्वाधिक पाऊस (सांगे) ४४ इंच.
सर्वात कमी पाऊस (मुरगाव) १९.६९ इंच.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.