Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: ऐन पावसाळ्‍यात कडकडीत ऊन, आठवडाभर कसं असेल हवामान हवामान? वाचा हवामान विभागाचा अंदाज

Goa Weather; मागील पाच-सहा दिवसांपासून गोव्यात पावसाने अक्षरशः दडी मारली आहे. तुरळक स्वरूपात झालेल्या सरींमुळे वातावरणात दमटपणा जाणवत असला तरी शनिवारचा दिवस मात्र उन्हाने होरपळून निघाला.

Sameer Amunekar

पणजी : मागील पाच-सहा दिवसांपासून गोव्यात पावसाने अक्षरशः दडी मारली आहे. तुरळक स्वरूपात झालेल्या सरींमुळे वातावरणात दमटपणा जाणवत असला तरी शनिवारचा दिवस मात्र उन्हाने होरपळून निघाला. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अशीच कोरडी स्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे.

गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत राज्यात केवळ ७.५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मान्सून हंगामात आतापर्यंत एकूण १९९५ मिमी म्हणजेच ७८.५४ इंच पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत १.३ टक्के पावसाची घट झाली आहे.

विभागनिहाय पाहता, उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत ६.२ टक्क्यांनी कमी आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. दुसरीकडे, दक्षिण गोव्यात मात्र सरासरीच्या तुलनेत ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे तेथील परिस्थिती तुलनेने स्थिर आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात सध्या कोणताही मोठा वातानुकुलीत बदल नसल्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. पुढील काही दिवस गोव्यात उन्हाचे व तापमानवाढीचे प्रमाण अधिक राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT