Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच! जोरदार सरींनंतर आता पुढील 48 तासांत पावसाची गती मंदावणार

Goa Rain Update: मागील दोन दिवसांपासून गोवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

Sameer Amunekar

पणजी: मागील दोन दिवसांपासून गोवा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत केपे येथे सर्वाधिक म्हणजे ४.३३ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकूण पावसाची आकडेवारी पाहता, आतापर्यंत गोव्यात ५६.८८ इंच पावसाची नोंद झाली आहे.

फोंडा येथे २.१६ इंच, जुने गोवे २.५१ इंच, सांगे २.४० इंच, धारबांदोडा २.२५ इंच, मडगाव २.१२ इंच, पणजी २.७ इंच, म्हापसा १.७४ इंच, साखळी १.२३ इंच, काणकोण येथे २५ मि.मी., दाबोळी १९ मि.मी. आणि मुरगाव येथे १६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाचे ढग पुढील दोन दिवस सौम्य राहतील, मात्र किनारपट्टी भागांत तुरळक सरी शक्य आहेत. मासेमारी व किनारपट्टीवर पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake vs Mongoose: 'कट्टर शत्रू' समोरासमोर! भर रस्त्यात मुंगूस-नागाच्या लढाईचा थरार, पाहा पुढे काय झालं...Video Viral

राज्यपालपदाच्या प्रवासासाठी राजकीय प्रवासाला सोडचिठ्ठी; पी. अशोक गजपती राजू यांचा तेलगू देसम पक्षाचा राजीनामा

'It's Family Matter', आमदार कार्लुस फेरेरा यांच्या तक्रारीबाबत बोलण्यास खासदार विरियातो यांचा नकार Video

दो भाई दोनों तबाही! मोठ्याने पदार्पणाच्या सामन्यातच विश्वविक्रम रचला, आता धाकट्याने 'हॅटट्रिक' घेत घातला धुमाकूळ; पाहा Video

Goa News Live Update: काणका येथील दुचाकी अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT