Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात 'यलो अलर्ट'; येत्या 3-4 तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Goa Weather: गोवा हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Manish Jadhav

Goa Weather: राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून लोक हैराण झाले आहेत. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात सूर्यदेव आग ओकत आहेत. गोवा हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने राज्यात आज (दि.18 एप्रिल) यलो अलर्ट जारी केला असून, पुढील 3 ते 4 तासात विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 34.6 अंश सेल्सिअस तर किमान 26.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील तीन दिवसात राज्यात तापमानाचा पारा वाढेल, अशी शक्यता वेधशाळने वर्तवली आहे.

यंदा मार्च महिन्यातच दोन वेळा तापमानाचा पारा 35 अंशांवर गेला होता. राज्यात आज 34.6 अंश सेल्सिअस नोंदवलेले तापमान आतापर्यंतचा उच्चांक आहे. राज्यातील सत्तरी, डिचोली, धारबांदोडा आणि सांगे या तालुक्यात हवामान ढगाळ राहणार असून, या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना याकाळात सतर्क राहण्याची तसेच, आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील लोक हैराण झाले असून, पावसाच्या शिडकाव्यामुळे गरमीपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेपासून बचावासाठी हवामान विभागाने नागरिकांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

SCROLL FOR NEXT