Weather Forecast IMD Issues Rainfall Alert For Many State
Weather Forecast IMD Issues Rainfall Alert For Many StateDainik Gomanak

IMD Goa Weather Update : यंदा गोव्यावर मेघराजाची कृपा! धो धो बरसणार पाऊस; सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

IMD Goa Weather Update : हवामान विभाग: देशात १०६ टक्के पर्जन्‍य शक्‍य
Published on

IMD Goa Weather Update :

पणजी, यंदा गोव्‍यात धो-धो पाऊस बरसणार आहे. कोकण व गोव्‍यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने सोमवारी (ता. १५) वर्तविली. नैऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) जून ते सप्टेंबरदरम्यानचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

त्यातून ही माहिती पुढे आली. देशात सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे. यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान देशभरात समाधानकारक पावसाची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत आहे. जूनपर्यंत तो सामान्य होईल.

त्यानंतर तेथे थंड पाण्याचा प्रवाह सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मॉन्सूनवर होण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे कोकण आणि गोव्‍यात पावसाच्या सरी बरसतील. महाराष्‍ट्रातही सरासरी इतका पाऊस पडेल. अर्थात हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यातील पहिला अंदाज जाहीर केला आहे. पुढील अंदाज मेच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात येईल.

Weather Forecast IMD Issues Rainfall Alert For Many State
South Goa : ‘गोवा सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन’ची स्थापना

धन ‘आयओडी’ अनुकूल ठरणार

बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सामान्य स्थितीत आहे. मॉन्सून हंगामात आयओडी ‘धन’ पातळीवर (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनच्या सुरुवातीला ‘एल निनो’ ओसरणार

प्रशांत महासागरात सध्या मध्यम ‘एल-निनो’ स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीलाच ‘एल निनो’ स्थिती निवळण्याची शक्यता आहे.

उष्‍मा, आर्द्रतेत वाढ; गोमंतकीय हैराण: राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून वाढत्या उष्णतेसह आर्द्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. आज राजधानी पणजीत ९४ टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली, जी सर्वसामान्य आर्द्रतेच्या तुलनेत १४ टक्के अधिक आहे. पुढील दोन दिवसांत उष्मा तसेच आर्द्रतेत वाढ होण्‍याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com