Goa Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

Goa Rain Alert: मागील २४ तासांत सरासरी ७ मिमी पावसाची नोंद झाली असून यावर्षी आतापर्यंत एकूण २५२५ मिमी म्हणजेच ९९.४१ इंच पावसाची नोंद झाली आहे. गोवा वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.

Sameer Panditrao

Goa Yellow Alert:राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीय प्रमाणात मंदावला आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला आहे.

२६, २७, २८ आणि २९ ऑगस्ट या सलग चार दिवसांत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याने या कालावधीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत सरासरी ७ मिमी पावसाची नोंद झाली असून यावर्षी आतापर्यंत एकूण २५२५ मिमी म्हणजेच ९९.४१ इंच पावसाची नोंद झाली आहे.

यामुळे राज्यातील पावसाचे शतक पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पाऊस शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून पुढील काही दिवसांतच हे लक्ष्य गाठले जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत केपे, धारबांदोडा, पेडणे, फोंडा तसेच इतर भागात तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यलो अलर्टमुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून निचांकी भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यातील पावसाची एकूण परिस्थिती आत्तापर्यंत समाधानकारक असून पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT