William Fernandez Dainik Gomantak
गोवा

Goa: जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडून आलो- विल्यिम फर्नांडीस

मार्ना- शिवोली पंचायतीवर उप-सरपंचपदी निवड करण्यात आलेल्या विल्यम (William Fernandez) फर्नाडीस यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: जनतेच्या सेवेसाठी लोकांनी आम्हांला पंचायत मंडळावर निवडणून दिलेले आहे त्यामुळे लोकमताचा आदर ठेवत प्रत्येकाने आपापल्या कामात सक्रीय असणे आवश्यक असल्याचे मत मार्ना- शिवोली पंचायतीवर उप-सरपंचपदी  निवड करण्यात आलेल्या विल्यम (William Fernandez) फर्नाडीस यांनी सांगितले. दरम्यान, माजी उप-सरपंच फ्रेडी फर्नाडीस यांनी अलिखीत करारानुसार महिन्याभरापूर्वीच आपल्या  पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

दरम्यान, बुधवारी सकाळी  बार्देश गट विकास कार्यालयातील अधिकारी मनोहर परवार (Manohar Parvar) यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत कार्यालयात  घेण्यात आलेल्या एका विशेष बैठकीत विलीयम फर्नाडीस यांची उप-सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निरीक्षक परवार यांनी  घोषीत केले. यावेळी सरपंच शर्मीला वेर्णेकर, पंच सदस्य सिल्वेस्टर फर्नाडीस, फेर्मीना फर्नाडीस, मोनाली पेडणेकर, विघ्नेश चोडणकर, अभय शिरोडकर, फ्रेडी फर्नाडीस तसेच विलीयम फर्नाडीस यांच्या  पत्नी स्टेफी विलीयम फर्नाडीस आणी हितचिंतक कार्यालयात  उपस्थित होते.

दरम्यान, शिवोली मतदार संघातील हणजुण -कायसुव पंचायतीच्या पाठोपाठ एकुण नऊ सदस्य संख्या असलेल्या मार्ना शिवोली पंचायतीचा ताबा शिवोलीचे विद्यमान आमदार विनोद पालयेंकर  यांच्याकडे आहे तथापि राज्यातील कर्फ्यू हटवताच पंचक्रोशीतील विकास कामांना पुन्हां चालना देण्यात येणार असल्याचे पालयेंकर यांनी त्यांची भेट घेतली असतां सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT