Goa Politics: गोव्यावर ‘आप’चा झेंडा फडकवण्याचा निर्धार

आज अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पत्रकार परिषद घेऊन गोमंतकीयांना संबोधित करणार आहे.
गोव्यावर ‘आप’चा झेंडा
गोव्यावर ‘आप’चा झेंडा Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी : आगामी विधानसभा निवडणुकीच्‍या (Goa Assembly election 2021) पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)) यांचे मंगळवारी गोव्‍यात आगमन झाले. त्‍यामुळे ‘आप’च्‍या (AAP) कार्यकर्त्यांमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण पसरले आहे. दरम्‍यान, केजरीवाल दाबोळी विमानतळावरून दुपारी 3 वाजता बाहेर आले, हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले, सरळ गाडीत जाऊन बसले व गेले. यामुळे सुमारे अडीच तास पावसाची तमा न बाळगता तसेच तहान-भूक विसरून त्यांच्या आगमनाच्या तयारीत असलेले कार्यकर्ते थोडे नाराज झाले. (Arvind Kejriwal will address a press conference to the people of Goa)

गोव्‍यात विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा झेंडा फडकवण्याचा निर्धार पक्षाने केला असून, राष्ट्रीय नेत्यांची गोवा भेट ही कार्यकर्त्यांसाठी फलदायी ठरण्‍याची जाणीव ठेवून हे नेते मंडळी सध्या गोव्यात येऊन आपले जाळे सर्वत्र विणू लागले आहेत. आज खुद्द केजरीवाल गोव्यात दाखल झाले. आता ते गोव्यासाठी कोणती योजना जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज ते पत्रकार परिषद घेऊन गोमंतकीयांना संबोधित करणार आहे.

गोव्यावर ‘आप’चा झेंडा
Goa: केजरीवालांनी हात उंचावून कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश

दरम्यान, केजरीवाल यांचे गोव्यात स्‍वागत करण्‍यासाठी दाबोळी विमानतळावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कोरोनाचा विसरही त्‍यांना पडलेला दिसला. पोलिसांनी त्यांना एकाच ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा ते दोन-चार गट करून उभे राहिले होते. दुपारी अडीच वाजता केजरीवाल यांच्या आगमनाची वेळ होती. पण ‘आप’चे कार्यकर्ते एक वाजल्यापासून जमू लागले होते. त्‍यात प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो तसेच राहुल म्हांबरे, मुख्य प्रवक्ते वाल्मिकी नायक, संदेश तेलेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"विमानतळावर गर्दी टाळण्यासाठी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन करत मी थेट गाडीत बसलो. त्यामध्ये कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हेतू नव्हता."

- अरविंद केजरीवाल, ‘आप’चे सर्वेसर्वा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com