Water Tanker In Bordem, Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: ‘व्हडली दिवाळी’ला पाणी-बाणी; बोर्डेत गृहिणींचे हाल, तुळशी विवाहाच्या तयारीत अडचणी

Water Shortage Goa: नळांना पाणी नसल्याने वडाचावाडा, मांद्रेकरवाडा, व्होडपान या भागातील लोकांची धांदल उडाली. गृहिणींचे तर अक्षरशः हाल झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: आज ‘व्हडली दिवाळी’च्या दिवशी नळ कोरडे पडल्याने डिचोली शहरातील बोर्डे परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली. सर्वत्र तुळशी विवाहाची ‘लगीनघाई’ सुरू असतानाच पाण्याची समस्या निर्माण झाल्याने बोर्डे येथील लोकांचे हाल झाले.

नळांना पाणी नसल्याने वडाचावाडा, मांद्रेकरवाडा, व्होडपान या भागातील लोकांची धांदल उडाली. गृहिणींचे तर अक्षरशः हाल झाले. ‘व्हडली दिवाळी’च्याच दिवशी पाण्यासाठी गृहिणींवर घागरी घेऊन घराबाहेर धावपळ करण्याची वेळ आली.

आज (१३ नोव्हेंबर) तुळशी विवाहाच्याच दिवशी पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने बोर्डे भागात नाराजी पसरली.

Bordem, Goa

नळांना पाणी नसल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली, अशी कैफियत लक्ष्मण सावंत आणि इतरांनी मांडली.

यावर्षीही त्याच घटनेची पुनरावृत्ती...

१) काल (मंगळवारी) दपारी नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अचानक बंद झाला. आज (बुधवारी) सायंकाळपर्यंत नळ कोरडे राहिल्याने बोर्डे भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती.

२) आज (बुधवार) सकाळी टँकरद्वारे बोर्डे भागात पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, पाणीपुरवठा मर्यादित करण्यात आल्याने तुळशी विवाहाची तयारी करण्यात लोकांना अनेक अडचणी आल्या.

३) गेल्या वर्षीही ‘व्हडली दिवाळी’च्याच दिवशी बोर्डे भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेवक ॲड. रंजना वायंगणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

SCROLL FOR NEXT