Minister Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

Goa River Pollution Control: नद्यांना जोडणाऱ्या नाल्‍यांमधील सांडपाणी आणि गाळ नद्यांमध्‍ये जात असल्‍यामुळेच राज्‍यातील नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

Manish Jadhav

पणजी: नद्यांना जोडणाऱ्या नाल्‍यांमधील सांडपाणी आणि गाळ नद्यांमध्‍ये जात असल्‍यामुळेच राज्‍यातील नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्‍यामुळे यापुढे नद्यांसोबतच नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही चाचणी करण्‍यात येईल. शिवाय प्रदूषणाच्‍या विश्‍‍लेषणासाठी उत्तर आणि दक्षिण गोव्‍यात स्‍वतंत्र लॅब स्‍थापन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी बुधवारी विधानसभा सभागृहात बोलताना केली.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी प्रश्‍‍नोत्तराच्‍या तासाला उपस्‍थित केलेल्‍या प्रश्‍‍नावर ते बोलत होते. मांडवी, झुआरी, साळसह राज्‍यातील ११ नद्या आणि ४५ तलाव प्रदूषित असल्‍याचे केंद्राचा अहवाल सांगतो. साळ नदीचे सर्वात जास्‍त प्रदूषण झालेले आहे. नद्या, तलावांच्‍या वाढत्‍या प्रदूषणाचा फटका स्‍थानिक जनतेला बसत आहे. हे प्रदूषण थांबवण्‍यासाठी जलस्रोत खात्‍याने कोणत्‍या उपाययोजना केलेल्‍या आहेत? शिवाय म्‍हापसा परिसरातील तार नदीच्‍या स्‍वच्‍छतेसाठी कोणती पावले उचलली आहेत? असे प्रश्‍‍न आमदार फेरेरा यांनी विचारले होते.

त्यायावर बोलताना मंत्री शिरोडकर म्‍हणाले, नद्यांचे (River) प्रदूषण प्रामुख्‍याने नाल्‍यांमुळे होत आहे. नागरिक तसेच व्‍यावसायिकांकडून सांडपाणी नाल्‍यांमध्‍ये सोडले जाते. हे पाणी नद्यांमध्‍ये मिसळते. त्‍यामुळे प्रदूषण वाढते. अशा स्‍थितीत असे सांडपाणी नाल्‍यांमध्‍ये येऊ नये, याची जबाबदारी स्‍थानिक पंचायतींनी घेतली पाहिजे. राज्‍यातील अनेक नद्या प्रदूषित झालेल्‍या आहेत. त्‍यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी जलस्रोत खात्‍याच्‍या प्रत्‍येक विभागात उपविभाग स्‍थापन करण्‍यात येणार असून, या उपविभागाकडे नद्यांचे प्रदूषण रोखण्‍याची जबाबदारी देण्‍यात येणार आहे. यापुढे नद्यांना जोडणाऱ्या सर्वच नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही चाचणी करण्‍यात येणार आहे.

नद्या तसेच तलावांचे प्रदूषण रोखण्‍यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्‍याची नितांत गरज आहे. त्‍यात सरकार अपयशी ठरत असल्‍याचा ठपका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ठेवला. नद्या, तलाव प्रदूषित झाल्‍याने गोमंतकीय जनतेला उच्च दर्जाचे मासे मिळत नसल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT