Subhash Phal Dessai Kerala visit Dainik Gomantak
गोवा

Goa Water Metro: 'वॉटर मेट्रो' सुरू करण्यासाठी मंत्री फळदेसाई केरळ दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनावाल यांची घेणार भेट

Subhash Phal Dessai Kerala visit: राज्याच्या अंतर्गत जलवाहतूक खात्याच्यावतीने (नदी परिवहन) राज्यात लवकरच अंतर्गत जलगदतीने जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Sameer Amunekar

पणजी: राज्याच्या अंतर्गत जलवाहतूक खात्याच्यावतीने (नदी परिवहन) राज्यात लवकरच अंतर्गत जलगदतीने जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांच्यासह अधिकारी केरळमधील ‘वॉटर मेट्रो’ची पाहणी करण्यासाठी गेले असून, सोमवारी त्यांन कोची वॉटर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांच्याकडून या सेवेची माहिती जाणून घेतली.

याविषयी फळदेसाई यांनी सांगितले की, गोव्यात ९० किलोमीटर जलवाहतूक करण्यासाठी उपलब्धता आहे. केरळमध्ये वॉटर मेट्रो हा यशस्वी प्रकल्प सुरू झाला आहे आणि केंद्र सरकारच्या मान्यतेमुळे कोची रेल मेट्रोला हा प्रकल्प दिला गेला आहे.

गोवा हा जागतिक पर्यटनस्थळावर असल्याने अंतर्गत जलवाहतूक होणे आवश्यक आहे. सायंकाळी केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनावाल यांच्याशी आपली भेट होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

राज्यातील जलमार्गाचा वापर झाल्यास सर्व बेटे जोडली जातील, त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल. जलमार्गाचा वापर झाल्यास रस्त्यावरील अपघात कमी होतील. त्याचबरोबर बेहरा यांच्याकडून माहिती मिळाली असून, ते प्रकल्प अहवालात गोव्याचाही समावेश करतील, अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT