Goa Water Crisis Dainik Gomantak
गोवा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Goa Water Crisis 2026: यंदा मोसमी पावसात ३१ टक्के घट झाल्याने त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. सप्टेंबरमध्येच सत्तरी तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: यंदा मोसमी पावसात ३१ टक्के घट झाल्याने त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. सप्टेंबरमध्येच सत्तरी तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे राज्यात भीषण पाणीसंकटाचे सावट आतापासूनच घोंगावू लागले आहे. हीच स्थिती राहिली, तर यावर्षी राज्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होऊ शकते.

पेयजलाबरोबरच सिंचनावरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच शेतकरीही अडचणीत येण्याची शक्यता अधिक आहे. नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे बागायती सिंचनाला प्रारंभ होत असतो. मे महिन्यापर्यंत सिंचनासाठी पाणी वापरले जाते. मात्र, आताच नद्यांनी तळ गाठल्याने शेतकरीही चिंतेत आहेत.

मार्च-मे दरम्यान राज्यात पाणीबाणी !

सत्तरीतील नद्यांमधील सध्याचा पाणीसाठा पाहता जानेवारीनंतर पाणी समस्या उद्भवू शकते. तसेच, मार्च-मे दरम्यान राज्याला भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागू शकतो. प्रसंगी पाणीबाणी लागू करण्याची वेळ सरकारवर येऊ शकते, असे काही अधिकारी आतापासूनच सांगू लागले आहेत.

जानेवारीनंतर राज्यात भीषण संकट

सध्याची स्थिती कायम राहिल्यास जानेवारीनंतर राज्यात पेयजलाची गंभीर समस्या उद्भवू शकते. जलस्रोत खात्याने सप्टेंबरमध्येच नद्यांवरील बंधारे अडवले असले, तरी आताच नद्यांनी तळ गाठल्याने या बंधाऱ्यांत किती दिवस पाणी साठून राहील, याबाबत शंका आहे. कारण, सध्या पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. वातावरणात बदल होऊन प्रचंड गर्मी वाढली आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी झपाट्याने घटत चालले आहे. याचे गंभीर परिणाम पेयजलपुरवठ्यावर होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

Election Commission Form 6 Removed: झंझट संपली! फॉर्म-6 सोबत आता द्यावे लागणार नाही ॲडिशनल डिक्लेरेशन; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Porvorim Traffic: उन्नत मार्ग सुरू, तरी कोंडी कायम; जोडमार्ग अपुरे, सायंकाळी पणजीत प्रवेश करताना वाहनचालकांची दमछाक

Goa Pedestrian Safety Audit: रस्ता सुरक्षेनंतर आता पादचारी सुरक्षा ऑडिट; जुन्या शिफारशी अपूर्ण, नव्या ऑडिटवर 2.2 कोटी खर्च

Goa SIR Voter Deletion: मतदार वगळल्याप्रकरणी निकाल; 'एसआयआर'मध्ये 'फॉर्म 8'चा पेच, गोवा खंडपीठाच्या निर्णयाकडे लक्ष

SCROLL FOR NEXT