Canacona Water Crisis Dainik Gomantak
गोवा

Water Shortage In Taleigao: वाढत्या बांधकामांमुळे ताळगावात पाणी समस्या! स्थानिकांचा आक्रोश; आमदार अन् अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Water Supply Issues Taleigao: ताळगाव मतदारसंघात गेल्या दोन दशकात अनेक पटीने बांधकामे झाल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ताळगाव मतदारसंघात गेल्या दोन दशकात अनेक पटीने बांधकामे झाल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारतींमुळे स्थानिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याचे टँकरने पाणी विकत घेण्याची पाळी येत आहे. या मतदारसंघात असलेल्या पाण्याच्या टाकीतून सांपॉल, व्हडलेभाट तसेच इतर परिसरात कमी पाणीपुरवठा होत आहे. हा पाण्याच्या (Water) समस्येचा प्रश्‍न आमदारांनी विधानसभेत मांडला तरी त्याचा पाठपुरावा करण्यात आला नसल्याने व अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

ताळगाव पठार येथे पाणीपुरवठा विभागाची पाण्याची टाकी आहे. गेल्या दोन दशकात ताळगावातील विविध भागात जुन्या इमारती मोडून त्याजागी गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. बांधकामे वाढली तरी पाणीपुरवठ्याच्या प्रमाणात वाढ करण्या आलेली नाही. व्हडलेभाट तसेच शंकरवाडी हा भागात पाण्याचा दाब खूपच कमी असल्याने पुरेसे पाणीही मिळणे कठीण होत आहे. सांपॉल येथे मॉडेल्स संकुल इमारत राहणाऱ्या नागरिकांना दोन दशकापूर्वी पाण्याची समस्या कधीच भासत नव्हती मात्र या परिसरात नव्या इमारतींची बांधकामे झाल्यापासून ही समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे.

एक तास पाणीपुरवठा!

या मतदारसंघात असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी वितरण केले जाते व शेवटचे टोक असलेल्या व्हडलेभाट परिसरात शेवटी पाणी येते व सर्वात अगोदर जाते. त्यामुळे जेमतेम एक तास पाणीपुरवठा होत असला तरी त्याचा दाब कमी असतो. या परिसरात असलेल्या विहिरी बुजविल्या गेल्याने लोकांना पाण्यासाठी पर्याय उरलेला नाही.

लोकांना भूर्दंड!

पाणीपुरवठा विभागात पाणी टँकरसाठी नोंद करूनही वेळेत पाणी मिळत नसल्याने खासगी पाण्याचे टँकरने पाणी आणावे लागते. पाण्याचे टँकरचे दरही हजार रुपये झाले असल्याने सामान्य लोकांना भूर्दंड पडत आहे. या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या आणखी एका टाकीची आवश्‍यकता असताना त्यासंदर्भात स्थानिक आमदारांकडून प्रयत्नही होताना दिसत नाहीत.

पंपाचा वापर!

काही लोकांनी पंप बसवून आपल्याकडे पाणी खेचून करण्याचे प्रकार केले आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही तपासणी केली जात नाही. या संकुलातील लोकांना दोन ते तीन दिवसांनी एक पाण्याचा टँकर आणावा लागतो. ही समस्या पणजीतील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक आमदारही त्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालत नसल्याने स्थानिक लोकांना पर्यायी पाण्याचा टँकरने पाणी खरेदी करण्यापासून पर्याय राहिलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT