goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा अपूर्व संगम! सद्‍गुरु भाऊ महाराज

wari 2024 : केरी माऊली वारकरी संप्रदायास दिल्या शुभेच्छा

गोमन्तक डिजिटल टीम

पाळी, सेवेतून परमेश्‍वराशी संवाद साधता येतो, म्हणून सेवा करा आणि ईश्‍वराला प्रसन्न करून घ्या, असे सांगताना दिंडी-वारी म्हणजे विठ्ठल भक्तीचा अपूर्व असा भक्तीसंगम असल्याची शुभेच्छापर प्रतिक्रिया बेतोडा येथील सद्‍गुरु पारवडेश्‍वर महाराज मठाचे अधिपती सद्‍गुरु भाऊ महाराज यांनी दिल्या.

माऊली वारकरी सांप्रदायातर्फे केरी - साखळी तसेच इतर भागातील शेकडो विठ्ठल भक्तांनी पायी वारीसाठी येथून प्रस्थान करण्यापूर्वी सद्‍गुरु भाऊ महाराज यांचे आशीर्वाद घेतले, त्यावेळी भाऊ महाराज बोलत होते.

विठ्ठल भक्तांचा दरवर्षी पायी वारीचा कार्यक्रम असतो. सद्‍गुरु पारवडेश्‍वर महाराज मठाशी संबंधित या विठ्ठल भक्तांनी सद्‍गुरु भाऊ महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सोहम राजे तसेच पारवडेश्‍वर मठाचे इतर अनुयायी उपस्थित होते.

सद्‍गुरु भाऊ महाराज म्हणाले की, आपण एखादे अनुष्ठान सुरू केले की ते पूर्णपणे पार पाडायला हवे. परमेश्‍वराची कृपा हवी असेल तर तशी मनात जीद्द बाळगूनच कार्यरत रहायला हवे. दरवर्षी आषाढी एकादशी जवळ आली की विठ्ठल भक्तांचा आनंद ओसंडून वाहत असतो. कधी एकदा पंढरीच्या पांडुरंगाला भेटतो अशी अवस्था या विठूरायाच्या भक्तांची होत असते, त्यामुळेच दरवर्षी अशा पायी वारीतील सहभागी भक्तांची संख्या वाढतच चालली आहे.

पायी वारीतून विठ्ठल भक्तीबरोबरच शारीरिक व्यायामही होत असल्याने आरोग्याला ही पायी वारी उत्तम ठरली आहे. विठ्ठलाच्या वारीची प्रतीक्षा सर्वच वारकऱ्यांना असते, आणि गोव्यातून शेकडो भाविक ही पायी वारी करतात. माऊली वारकरी सांप्रदायाने ही पायी वारी आयोजित करून विठ्ठल भक्तांना चांगली अनुभुती मिळवून दिली असून ही वारी दरवर्षी अव्याहतपणे सुरू रहावी असे आवाहन भाऊ महाराज यांनी केले.

माऊली वारकरी सांप्रदायाच्या या पायी वारीत पुरुषांबरोबरच महिला वारकऱ्यांचाही मोठा सहभाग आहे. वारीवेळी पारवडेश्‍वर सांप्रदायाचे सोहम राजे तसेच इतर मान्यवरांनीही वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

विठुरायाचा झाला गजर...

माऊली सांप्रदायाच्या या पायी वारी प्रस्थानावेळी विठूरायाचा गजर झाला. टाळ मृदंगाच्या जयघोषात हा गजर झाला. वारकऱ्यांचा अंगी वेष, हातात टाळ, चिपळ्या, महिला वारकऱ्यांकडून डोईवर तुळशी वृंदावन अशा पारंपरिक वेषात या वारकऱ्यांनी पंढरपूरसाठी प्रस्थान केले. विठूरायाबरोबरच सद्‍गुरु पारवडेश्‍वर महाराजांबरोबरच सद्‍गुरु भाऊ महाराजांचाही जयजयकार यावेळी झाला. शिस्तबद्धरित्या वारी मार्गस्थ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two US Navy Aircraft Crash: 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

Prithvi Shaw Double Century: 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Shashi Tharoor: आर्यन खानची वेब सीरीज बघून शशी थरूर यांनी केले ट्विट, शाहरुखला म्हणाले, "एक बाप म्हणून तुला... "

टक्सीवाल्यांनी ब्लॅकमेल केलं, त्रास दिला; पर्यटक संतापला म्हणाला, पुढच्यावेळी गोवा की फुकेत? याचा विचार करावा लागेल

Rohini Kalam: क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT