Goa Fraud Case: गोव्यातील 500 जणांना 2 कोटी 90 लाखांचा गंडा, जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; सावंतवाडीतील तिघांना अटक

Fraud Case News: अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून आणि जादा परताव्याचे आमिष देऊन शेकडो गुंतवणूकदारांना लुटण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत.
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

सावंतवाडी: अल्पावधीत श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून आणि जादा परताव्याचे आमिष देऊन शेकडो गुंतवणूकदारांना लुटण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. गोव्यातील तब्बल ५०० हून अधिक जणांना 'बायोकॉईन' आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी धडक कारवाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि बांदा येथील तिघा संशयितांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांनी 'बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि.' नावाची कंपनी स्थापन केली होती. म्हापसा येथे कार्यालय थाटून संशयितांनी लोकांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार वेनॉन डायस (रा. सांतइस्तेव) यांच्यासह इतर ५०० जणांना कंपनीच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले.

केवळ क्रिप्टो करन्सीच नव्हे, तर तोरसे-पेडणे येथील जमीन व्यवहार आणि कंपनीच्या कथित निवृत्ती वेतन योजनेतही गुंतवणूक करून घेण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. सुरुवातीला मोठा नफा मिळेल असे सांगून संशयितांनी गुंतवणूकदारांकडून २ कोटी ९० लाख रुपये गोळा केले आणि नंतर हात वर केले.

Goa Fraud Case
Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

तिघांना अटक

या फसवणूक प्रकरणात सावंतवाडी आणि बांदा येथील लोकांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोवा पोलिसांनी या कारवाईत सुभाष धुरी (वय ४५, रा. बांदा), दिगंबर भट (वय ४०, रा. आरोस-सावंतवाडी) आणि सारिका पिळणकर (वय ४०, रा. सावंतवाडी) या तिघांना अटक केली आहे.

या तिघांनी गोव्यातील लोकांना या गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. शुक्रवारी या संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Goa Fraud Case
Goa Protest: '..ही लूट थांबवा'! शेळ- लोलये टोल नाक्यावर नागरिकांचे आंदोलन; ई-चलनच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप

या प्रकरणात केवळ हे तिघेच नव्हे, तर एका मोठ्या टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कंपनीचे संचालक गुलाबराव करंजुले, त्यांची पत्नी अश्विनी करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

या संशयितांनी नियोजनबद्धरीत्या गोवेकरांची फसवणूक केली असून, तपासाची व्याप्ती वाढल्यास फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आता या टोळीच्या आर्थिक व्यवहारांची आणि बँकेतील खात्यांची कसून चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com