Salman Khan Net Worth: गॅलेक्सी अपार्टमेंट, ऑडी-मर्सिडीज आणि बरंच काही... बॉलीवूडच्या 'भाईजान'ची एकूण संपत्ती किती? आकडे पाहून व्हाल हैराण

Salman Khan Birthday: बॉलीवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची साठी गाठली असली तरी सलमानची क्रेझ आजही कायम आहे.
Salman Khan Net Worth
Salman Khan Net WorthDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलीवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची साठी गाठली असली तरी सलमानची क्रेझ आजही कायम आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर उत्पन्नाच्या बाबतीतही भाईजानने मोठ्या उद्योजकांना मागे टाकले आहे. २९०० कोटी रुपयांच्या अफाट संपत्तीचा मालक असलेला सलमान खान नक्की कशी कमाई करतो आणि त्याचे व्यावसायिक साम्राज्य किती विस्तारले आहे, याचा हा विशेष आढावा.

सलमान खान हा केवळ बॉलीवूडचा सुपरस्टार नाही, तर तो एक ब्रँड बनला आहे. विविध अहवालानुसार, सलमानची एकूण संपत्ती २९०० कोटी रुपयांच्या घरात आहे. जरी वर्षातून त्याचे चित्रपट मर्यादित येत असले, तरी टेलिव्हिजनच्या माध्यमातून तो मोठी कमाई करतो. गेल्या अनेक वर्षांपासून 'बिग बॉस' या प्रसिद्ध रिॲलिटी शोचे तो होस्टिंग करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका सीझनसाठी सलमान तब्बल २५० कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय, एका चित्रपटासाठी त्याचे मानधन १०० कोटी रुपयांच्या आसपास असते, जे त्याला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अग्रस्थानी ठेवते.

Salman Khan Net Worth
Goa Protest: '..ही लूट थांबवा'! शेळ- लोलये टोल नाक्यावर नागरिकांचे आंदोलन; ई-चलनच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप

सलमान खानची कमाई केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही. त्याचे स्वतःचे 'सलमान खान फिल्म्स' (SKF) हे प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच, त्याचा 'बीइंग ह्युमन' हा लाइफस्टाइल ब्रँड जगभरात प्रसिद्ध आहे. या ब्रँडचे मूल्य सुमारे २३५ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, थम्स अप, इमामी आणि यात्रा यांसारख्या मोठ्या जागतिक ब्रँड्सचा तो चेहरा आहे. या जाहिरातींच्या माध्यमातून सलमान वर्षाला ६० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवतो.

रिअल इस्टेटमधील मोठी गुंतवणूक

सलमान खानचे राहणीमान साधे असले तरी त्याची रिअल इस्टेट गुंतवणूक थक्क करणारी आहे. मुंबईच्या बांद्रामधील 'गॅलेक्सी अपार्टमेंट'मध्ये तो राहतो, ज्याची किंमत १०० कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच, पनवेलमध्ये १५० एकरमध्ये पसरलेले त्याचे 'अर्पिता फार्म्स' हे विलासी फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये स्वतःचे हेलिपॅड, खाजगी पूल आणि जिम यांसारख्या सोयी आहेत. गोराईमध्येही त्याचे एक आलिशान 'बीच हाऊस' आहे. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य ५०० कोटी रुपयांच्या वर जाते.

Salman Khan Net Worth
Goa Fraud Case: गोव्यातील 500 जणांना 2 कोटी 90 लाखांचा गंडा, जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; सावंतवाडीतील तिघांना अटक

महागड्या गाड्या आणि घड्याळांची आवड

गाड्यांच्या बाबतीतही सलमान मागे नाही. त्याच्या ताफ्यात रेंज रोवर, ऑडी R8, मर्सिडीज एस-क्लास आणि लेक्सस यांसारख्या ५० कोटींच्या गाड्या आहेत. मात्र, गाड्यांपेक्षाही महागडी घड्याळे सलमानच्या संग्रहात आहेत. त्याच्याकडे असलेल्या 'पाटेक फिलिप' घड्याळाची किंमत काही आलिशान कारपेक्षाही अधिक आहे. ६० व्या वर्षीही सलमानचे हे अफाट साम्राज्य त्याच्या परिश्रमाची साक्ष देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com