Rare Goan food: 1960 नंतर कमी झालेले, दुर्मिळ गोवन अन्नपदार्थ

Traditional Goan Dishes: ख्रिसमसच्या निमित्ताने जे पदार्थ ख्रिश्चन बांधवांच्या घरी तयार होतात त्यावर विविध ठिकाणी छापून येतच असते.
Traditional Goan dishes
Traditional Goan dishesDainik Gomantak
Published on
Updated on

ख्रिसमसच्या निमित्ताने जे पदार्थ ख्रिश्चन बांधवांच्या घरी तयार होतात त्यावर विविध ठिकाणी छापून येतच असते. दोदोल, बेबिंका, कुलकूल, बोलिन्हास, नेवऱ्या हे स्वादिष्ट पदार्थ साऱ्यांनाच ठाऊक आहेत.‌ मात्र, साधारण १९६० पूर्वी ख्रिश्चन धर्मियांच्या घरात सामान्य असणारे अनेक अन्नपदार्थ आता दुर्मिळ झाले आहेत. या साऱ्या अन्नपदार्थांवर पोर्तुगीज तसेच जगभरच्या पोर्तुगीज वसाहतींचा प्रभाव होता. यातील का

ही पदार्थांची ओळख करून घेणे रोचक ठरेल!

कॅंजा दे गाल्हीन्ह्या : उपवासाच्या दिवसात (किंवा आजारपणात) कॅथलिक घरांमध्ये चिकन आणि भाताचे हे सूप  एकेकाळी सामान्य होते. पोर्तुगाल तसेच ब्राझीलमध्येही ही पाककृती लोकप्रिय आहे. सर्दी किंवा पचनाची समस्या असल्यास हा पौष्टिक पदार्थ सेवन केला जात असे.

काल्दो वेर्दी : बटाटा आणि हिरव्या भाज्यांच्या या सूपमध्ये स्थानिक पालेभाज्यांचा वापर होत असे.  काल्दो वेर्दीचे शब्दशः भाषांतर ‘हिरवा रस्सा’ असे आहे. हे पोर्तुगालचे राष्ट्रीय आणि सर्वात प्रिय असे सूप आहे. वर्षभर, कौटुंबिक जेवण आणि उत्सवांमध्ये या सूपचा आस्वाद घेतला जातो. 

सोपा दौराद : बहुस्तरीय ब्रेड, अंड्याचा पिवळा भाग आणि साखर यांच्या मिश्रणातून सोनेरी झाक मिळणारे हे पारंपरिक पोर्तुगीज सूप आहे.‌ पुडिंगसारखा पोत असलेल्या या पदार्थात ब्रेडचा थर, दालचिनी, लिंबूचे सिरप आणि अंड्याचे कस्टर्ड या घटकांचा समावेश असतो. 

आलमोंदेगस : पोर्तुगीज ब्राझिलियन आणि फिलिपिनी पाककृतींमधला हा दैनंदिन पदार्थ आहे. मांसाचे वाटण करून त्यात ब्रेडक्रंब, कांदे, अंडी आणि इतर मसाला मिळवून त्यांचे मिटबॉल्स बनवले जातात.

आरोज दोसे : ही पोर्तुगीज पद्धतीने बनवलेली तांदळाची खीर आहे.  जाड, मलईदार आणि भरपूर दालचिनी असलेली ही खीर चवीला गोड असते. 

इंसोपादो दे पेशे :  कांदा आणि विनेगर यांच्या मिश्रणात मासे शिजवले जातात. आपल्या नेहमीच्या फिश करीपेक्षा हा पदार्थ थोडा वेगळा असतो.‌ पोर्तुगीज प्रभाव असलेल्या या पदार्थात स्थानिक मसाले, नारळ आणि चिंच यासारखेही घटक वापरले जातात.

Traditional Goan dishes
Sea Food Goa: शॅकवर अस्सल रुचिक फिश-थाळी हवीच...! खवय्यांची पहिली पसंत; मत्स्याहारींच्या जीभेवर रेंगाळते गोवन चव

पाव रेशादो कॉम कार्नी : मांसाचे बारीक तुकडे भरलेले हे ब्रेड उत्सव आणि पिकनिकसाठी लोकप्रिय आहेत. पोर्तुगाल आणि ब्राझीलमध्ये देखील लोकप्रिय असलेल्या या पदार्थांत चीज आणि कांद्याचाही समावेश असतो. 

Traditional Goan dishes
Goan Food Culture: गोव्याचा पाव, शेजारील राज्यातही खातोय भाव! म्हापसा बाजारपेठेतून मुंबई, बंगळुरुसह अन्य शहरांत पुरवठा

सोपा दे फेंजाव : बदाम आणि अंडी हे घटक असलेला हा सूपसदृश पदार्थ विविध प्रकारची धान्ये (किंवा भाज्या) टाकून बनवला जात असे. ‘बीन्स सूप’ असाच या ‘सोपा दे फेंजाव’चा शब्दशः अर्थ होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com