Shantadurga Devi Jatra: श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची जत्रा, सर्व धर्म एकतेचे प्रतिक

Shantadurga Kunkallikarin Devi Jatra: कारण या जत्रेत हिंदू भाविक ज्या भावनेने आणि भक्तीने सामील होतात त्याच भावनेने आणि भक्तीने ख्रिस्ती भाविकही सामील झालेले असतात.
Shree Shantadurga Kunkallikarin Devi Jatra
Shree Shantadurga Kunkallikarin Devi JatraDainik Gomantak
Published on
Updated on

गावातील देऊळ आणि त्या देवळातील जत्रा ही गोष्ट सर्वांच्याच जिव्हाळ्याची असते. आम्हा कुंकळ्ळीच्या लोकांसाठी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची जत्रा म्हणजे एक पर्वणीच. ही जत्रा आमच्यासाठी केवळ एक धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव नसतो तर आम्ही सर्व धर्म एकतेचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहत असतो. कारण या जत्रेत हिंदू भाविक ज्या भावनेने आणि भक्तीने सामील होतात त्याच भावनेने आणि भक्तीने ख्रिस्ती भाविकही सामील झालेले असतात.

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीला मागणीची देवी म्हणून ओळखले जाते. ही देवी माणसांना मागते आणि देवीची मागणी असलेला भक्त आपली मागणी फेडण्यासाठी जत्रेला जाऊन देवीचे दर्शन घेतोच. ही देवी फक्त हिंदूंनाच मागणी घालते, असे नव्हे ख्रिस्ती लोकांनाही मागणी घालते. ‘मी देवीच्या मागणीचा’ असे सार्थ अभिमानाने सांगणारे अनेक ख्रिस्ती भाविक तुम्हाला कुंकळ्ळी परिसरात सापडतील.

मीही देवीच्याच मागणीचा. माझ्यात जी कलाकुसर करण्याची आणि शिल्पकला करण्याची कला निर्माण तयार झाली ती या देवीच्याच आशीर्वादाने, असे मला सतत वाटत असते. मी कुंकळ्ळी गावातील ताकाबांध या भागात राहणारा.

लहान असताना आम्हाला ज्यावेळी या जत्रेची सुलुस लागायची त्यावेळी एकप्रकारे वेध सुरू व्हायचे. माझे वडील शिवाजी शिंदे हे या जत्रेत फोटो फ्रेम्स विकण्याचे दुकान थाटायचे. जगप्रसिद्ध चितारी कला पुढे नेणारे चितारी कारागीर यांचा ‘देमानी’ हा वाडा आमच्या वाड्यापासून एक किलोमीटर अंतरावर.

Shree Shantadurga Kunkallikarin Devi Jatra
Shantadurga Fatarpekarin Jatrotstav: शांतादुर्गा फातर्पेकरिणीची रविवारी जत्रा, 24 रोजीपर्यंत विविध कार्यक्रम; 25 रोजी पहाटे श्रींचा ‘महारथ’

सुबक असे रंगबीरंगी लाकडी पाट, लहान मुलांची लाकडी खेळणी हे कारागीर तयार करायचे. ही खेळणी विकत घेण्यासाठी आम्हा मुलांची गर्दी पडायची. ही जत्रा फक्त हिंदू आणि ख्रिस्ती लोकांचेच मीलन करणारा उत्सव नसून या उत्सवात उद, धूप विकण्यासाठी काही मुस्लीम व्यापारीही यायचे.

Shree Shantadurga Kunkallikarin Devi Jatra
Shantadurga Temple: '..झळाळती कोटी ज्योती या'! डिचोली शांतादुर्गा मंदिरात 2000 पणत्या प्रज्वलित, दीपोत्सव उत्साहात Video

आज हे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही काही असे मुस्लीम व्यापारी येतात. त्यांच्यासाठी या जत्रेचे महत्त्व फक्त व्यावसायिक नसते तर त्यांच्याही भावना या जत्रेशी हिंदू भाविकांएवढ्याच जुळलेल्या आहेत. आज कित्येक ठिकाणी धर्माच्या नावाने लोकांमध्ये विभागणी होत असताना फातर्पा हे सर्व धर्म समभाव पाळणारे क्षेत्र बनून राहिले आहे, ही एक दिलासा देणारी बाब नव्हे का?

विदेश शिंदे | चित्रकार, शिल्पकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com