जागतिक चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता बी साई प्रणीतने सोमवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेने बी साई प्रणीतने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने वयाच्या 31 व्या वर्षी बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. साई प्रणीत हा तोच स्टार शटलर आहे, ज्याने 2019 च्या जागतिक चॅम्पियनशिप हंगामात इतिहास रचला होता.
वास्तविक, साई प्रणीतने 2019 च्या जागतिक चॅम्पियनशिप हंगामात कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. 36 वर्षांनंतर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. यापूर्वी, 1983 मध्ये प्रकाश पदुकोण यांनी कांस्यपदक जिंकले होते.
दरम्यान, 2019 हे वर्ष साई प्रणीतसाठी खूप खास होते. जागतिक चॅम्पियनशिप हंगामात कांस्यपदक जिंकण्याबरोबरच त्याला अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले. उजव्या हाताचा भारतीय शटलर प्रणीतने 2003 च्या थायलंड ओपन ग्रां प्री गोल्ड स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मलेशियाच्या मुहम्मद हाफिज हाशिमचा पराभव केला होता. पण त्याला खरी ओळख 2013 मध्येच मिळाली जेव्हा स्थानिक प्रेक्षकांसमोर तौफिक हिदायतला पराभूत केले. इंडोनेशिया ओपनच्या पहिल्या फेरीत त्याने ही कामगिरी केली होती.
साई प्रणीतने 2008 मध्ये पहिल्यांदा आपला जलवा दाखवून दिला. त्यानंतर त्याने राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील पुरुष दुहेरीत कांस्यपदक जिंकले. यानंतर 2010 च्या जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपच्या एकेरीत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 2016 मध्ये साई प्रणीतने सलग 2 पदके जिंकली.
दरम्यान, यावर्षी साई प्रणीतनेही कारकिर्दीतील एकमेव सुवर्णपदक जिंकले. भारतात झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. तसेच, भारताने आयोजित केलेल्या आशियाई सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यानंतर 2019 चा हंगाम आला, जेव्हा साई प्रणीतने जागतिक चॅम्पियनशिप मध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला.
स्टार शटलर साई प्रणीतने पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये पुन्हा एकदा कांस्यपदक जिंकले. आशियाई सांघिक स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. मात्र, यानंतर त्याला कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पदक जिंकता आले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.