Vishwajit Rane:
Vishwajit Rane:  Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: मी पेशाने डॉक्टर नसलो तरी आरोग्य सुविधेत गोवा सर्वोत्तम करण्याचा माझा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Vishwajit Rane: मी पेशाने डॉक्टर नसलो तरी देखील माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या अनुभवावर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गोव्याच्या जनतेच्या आरोग्याच्या अनुषंगाने ज्या काही सुविधा देता येतील, त्या देण्यासाठी प्रयत्नरत आहे.

आरोग्य सुविधेत गोवा सर्वोत्तम करण्याचा आपला प्रयत्न आहे,असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले.

आरोग्य संचालनालय, यूई लाईफ सायन्स, एसबीआय फाऊंडेशन आणि युव्हीकॅन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 वर्षांवरील राज्यातील 1 लाख महिलांचे स्तनकर्करोग चाचणीचा टप्पा पूर्ण केल्यामुळे आयोजित विशेष कार्यक्रमात दरबार हॉल, राजभवन येथे ते बोलत होते.

यावेळी आरोग्य सचिव अरूणकुमार मिश्रा, युई फाईफ सायन्सच्या सीईओ गौरी नवलकर, संचालक डॉ. गीता काकोडकर, डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. अनुपमा बोरकर, महिला व बालकल्याण संचालनालयाच्या उपसंचालक ज्योती देसाई उपस्थित होत्या.

दरम्यान राणे म्हणाले, गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे 1 लाख महिलांचे स्तनकर्करोग स्क्रिनिंगचा टप्पा पूर्ण केला आहे.

येत्या दीड वर्षात 2.50 लाख महिलांचे स्क्रिनिंग पूर्ण करण्याचे उदिष्ट असल्याचे राणे यांनी सांगितले.

‘फेसगो’ डोस देणार मोफत !

अनेकदा महिला स्तन कर्करोगाकडे दुर्लक्ष करतात. माझ्या कुटुंबात हा प्रसंग घडल्याने त्या वेदना मी जाणतो. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत कधीच हलगर्जीपणा करू नका.

स्तन कर्करोगाचे जेवढ्या लवकर निदान करता येईल, तेवढ्या लवकर त्यातून बाहेर पडता येते. त्यामुळे येत्या काळात ‘फेसगो’ नामक डोस ज्याची किंमत लाखो रूपयात आहे, असा डोस गोव्यातील स्तनकर्करोग ग्रस्तांना मोफत देणार असल्याचे आरोग्यमंंत्री राणे यांनी सांगितले.

आरोग्य विमा योजनेत सुधारणा करणार-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देशात आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवत आहोत. येत्या काळात मोठ्या प्रमाणात हेल्थ रेकॉर्डचे डिजिटलायजेशन करण्याचे कार्य हाती घेतले जाईल.

जेणेकरून प्रत्येकांच्या आरोग्यविषयक माहिती प्राप्त होईल व कोठेही उपचार घेण्यास मदत होईल. त्यासोबत राज्यातील आरोग्य विमा योजनेत सुधारणा करणार असून याबाबत मुख्यमंत्री डॉ.सावंत यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

जनतेच्या आरोग्यासंबंधी खर्च करण्यात सरकार मागे हटणार नाही,असे राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT