Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: आपत्कालीन सेवेसाठी 'पॉवरग्रीड'तर्फे 8 रुग्णवाहिका प्रदान; गोव्यात आरोग्य सेवांचा विस्तार करणार- राणे

Vishwajit Rane: गोमेकॉमध्ये पेट स्कॅन सुविधा लवकरच उपलब्ध होणार- राणे

Ganeshprasad Gogate

Vishwajit Rane: मंगळवारी वनभवन पणजी येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते 8 रुग्णवाहिकांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान राणे म्हणाले की, पॉवरग्रीड महामंडळाने देणगी दिलेल्या या 8 रुग्णवाहिका 108 आपत्कालीन सेवेद्वारे वापरल्या जाणार आहेत.

याशिवाय महापालिका क्षेत्रातील उपआरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण नगरविकास विभागांतर्गत केले जाणार असल्याचेही राणेंनी सांगितले.

उत्तर आणि दक्षिण गोव्याला 100 कोटी रुपयांची दोन आपत्कालीन केंद्रे मिळाली असून आम्ही त्यांना चालना देण्याच्या प्रयत्न करत असल्याचे राणेंनी सांगितले.

तसेच गोमेकॉमध्ये पेट स्कॅन सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असून या पेट स्कॅन सुविधेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्यता दिली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने स्टेमी प्रोग्राम डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे, ही अभिमानाची बाब असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएमसीला अधिक सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची गरज असल्याचेही राणेंनी सांगितले.

गोव्यात आरोग्य मॉडेल पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार करण्यात येत आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कर्मचाऱ्यांची उणीव आहे. काही सेवा कार्यान्वित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची गरज असल्याचे राणेंनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT