Viral video Goa Gaundalim bridge Dainik Gomantak
गोवा

Viral Video: गोव्यात 'फॅमिली पॅक' स्टंट! स्कुटीवरुन एक दोन नव्हे तर 5 जणांचा जीवघेणा प्रवास; गवंडाळी येथील थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa Viral Video Bike Overloading: सध्या गवंडाळी भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Manish Jadhav

पणजी: सोशल मीडिया हे मनोरंजनासोबतच अनेकदा समाजातील विदारक वास्तव समोर आणते. सध्या गवंडाळी भागातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या दुचाकीवरुन एक-दोन नव्हे, तर चक्क पाच जणांना घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून केला जाणारा हा प्रवास कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतो.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, एका दुचाकीवर पाच जण अशा प्रकारे बसले आहेत की चालकाला गाडी नीट हाताळणेही कठीण जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन लहान मुलेही आहे. गोव्यातील रस्ते अरुंद आणि वळणावळणाचे असताना अशा प्रकारे ओव्हरलोडिंग करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. मागून येणाऱ्या एका प्रवाशाने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाहतूक (Transport) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि लोकांच्या बेजबाबदारपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अपघातांना निमंत्रण देणारी प्रवृत्ती

गोव्यातील (Goa) रस्ते अपघातांचे प्रमाण अलीकडच्या काळात चिंताजनक रीतीने वाढले आहे. अशा परिस्थितीत, एका दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवणे केवळ स्वतःचाच नाही, तर रस्त्यावरील इतर वाहनधारकांचाही जीव धोक्यात घालणारे आहे. तोल जाणे, टायर फुटणे किंवा अचानक ब्रेक लावल्यास अशा परिस्थितीत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. पोलीस वारंवार जनजागृती करत असतानाही केवळ सोयीसाठी किंवा गंमत म्हणून केले जाणारे हे प्रकार जीवघेणे ठरु शकतात.

पर्यटन किंवा फिरण्याच्या नादात स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याशी खेळू नका, केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर सुरक्षितपणे घरी पोहोचण्यासाठी नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT