उपसा बंद झाल्‍याने लामगाव परिसरातील एका खंदकात पावसाळ्‍यापूर्वीच भरलेले पाणी Dainik Gomantak
गोवा

Goa: खाणपट्ट्यांतील गावांना पुराचा धोका!

खंदकांतील पाणी उपसा बंद: दरड-माती कोसळण्याचा धोका

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍य सरकारने दिलेल्‍या नोटिशीनुसार राज्‍यातील खाण कंपन्‍यांनी खंदकांतील (खाणपीट) पाणी उपसा करणारे पंप काढून टाकल्‍याने पावसाळ्यात गंभीर परिस्‍थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. खाणपट्ट्यांतील अनेक गावांमध्‍ये पूर येऊन हाहाःकार माजण्‍याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. मुळगाव, लामगाव व शिरगाव या डिचोली तालुक्‍यातील गावांना मोठा धोका संभवत आहे.

पिसुर्लेतील खाण कंपन्‍यांनी लावलेले पाणी उपसा पंप गेल्‍या दोन वर्षांपासून बंद आहेत. आता जलस्रोत खात्‍याने दोन मोठे पंप आणले आहेत. हे पंप सुरू होताच खाणपीटातील पाणी काढण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पिसुर्लेतील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी दिली. यासाठी जलस्रोत खात्‍याने शक्‍य तितक्‍या लवकर हे पंप सुरू करावेत, असे आवाहन त्‍यांनी केले.

राज्‍य सरकारने 88 खाण कंपन्‍यांना संबंधित जागांवरील यंत्रसामग्री हटविण्याची नोटीस पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्‍यांनी यंत्रसामग्री हटविण्यास सुरूवात केली असून खाणपीटातील पाणी बाहेर काढण्यासाठी लावलेली पंपिंग व्‍यवस्‍था काढून टाकली आहे. खाणपीटातील पाणी बाहेर काढणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. पावसाळा तोंडावर आल्‍याने पाणी बाहेर काढले नाही तर खाणपट्ट्यांतील अनेक गावांमध्‍ये हाहाकार माजेल, अशी भीती काही दिवसांपूर्वी ‘आयटक’चे नेते ख्रिस्‍तोफर फोन्‍सेका यांनी व्‍यक्‍त केली होती.खाण कंपन्‍यांनी पाण्याचे पंप काढून टाकले आहेत. तसेच येथील वीजही बंद केली आहे. यावर्षी मान्‍सून आठवडाभर आधी येण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्‍याने वर्तवली आहे. खाणपीटांतील पाणी बाहेर काढण्यासाठी पंप बसवणे आणि माती पडून खाणपीटे भरू नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी आता सरकारकडे अवघेच दिवस आहेत. लामगाव, शिरगाव, पैरा, कुडणे, साखळी, न्‍हावेली, आमोणे, सुर्ला, पाळी या परिसरातील खाणी पाण्याने भरलेल्‍या आहेत. त्‍यात माती पडल्‍यास परिसरातील गावांना धोका निर्माण होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी याचा तडाखा मुळगावला बसला होता.

मुळगावात भुस्खलनाची शक्‍यता

मुळगाव परिसरातील खाणपीटांच्‍या स्‍थितीची माहिती घेतली असता तेथे भूस्‍खलन होऊन माती पाण्यात पडण्याची शक्‍यता बळावली आहे. तसेच खाणपीटात साचलेले पाणी पावसाळ्यापूर्वी उपसा न केल्‍यास मुळगावला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळा जवळ येऊन ठेपला असून येथील माती किंवा डोंगर खाणपीटात कोसळण्यापूर्वी सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा मुळगावात काही वर्षांपूर्वी निर्माण झालेली पूरस्‍थिती पुन्‍हा येऊ शकते, अशी भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

खाणपीटांमध्‍ये साचणारे पाणी परिसरातील शेतींना पुरवले जाते. पिसुर्ले परिसरातील खाण कंपन्‍यांना बंद पंप सुरू करण्याची विनंती करूनही त्‍यांनी कार्यवाही केलेली नाही. सध्या जलस्रोत खात्‍याने येथील खाणपीटात दोन पंप बसवले आहेत. खनिज काढून झाल्‍यावर तेथे मोठे खंदक तयार होतात. तसेच सभोवताली माती साठलेली असते. खाणपीटांतील पाण्याचा उपसा न केल्‍यास ही माती पडून आतील पाणी बाहेर येऊन परिसरातील लोकवस्‍तीला धोका निर्माण होऊ शकतो.

- हनुमंत परब, सामाजिक कार्यकर्ते (पिसुर्ले)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT