साखळीतील श्रीया नाईक देसाईने घेतली ‘गीताव्रती’ उपाधी

उत्तम कामगिरी: अवघ्या अकराव्या वर्षी भगवद््गीतेतील 700 श्लोक पाठ
Shriya Naik Desai
Shriya Naik DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: साखळी येथील गृहनिर्माण वसाहतीत रहाणारी कु. श्रीया विशालकुमार नाईक देसाई या चिमुकलीने वयाच्या अकराव्या वर्षी संपूर्ण भगवद््गीता अठरा अध्याय 700 श्लोक पाठ करून त्यामध्ये अत्यूतम श्रेणीमध्ये ‘गीताव्रती’ ही उपाधी प्राप्त केली.

कारापूर-साखळी येथील केशव बळीराम हेडगेवार विद्या मंदिरात इयत्ता सहावीत श्रीया नाईक शिकत आहे. स्वामी गोविंदेवगिरी महाराज प्रणित गीता परिवारतर्फे कोरोना काळात ऑनलाईन पध्दतीने गीतेचे धडे श्रीयाने गिरविले. चार स्तरांची परीक्षा ती उत्तीर्ण झाली. पहिल्या स्तरात ३ अध्याय, दुसऱ्या स्तरात 6 अध्याय, तिसऱ्या स्तरात 12 अध्याय व चौथ्या स्तरात तिने १८ अध्याय पूर्ण केले आहेत.

Shriya Naik Desai
उत्तर प्रदेशाप्रमाणेच गोव्यातही आढळू शकतात मंदिराचे अवशेष, सर्वेक्षणाची गरज: सुदिन ढवळीकर

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन पद्धतीने गीता परिवारातर्फे सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मोफत प्रशिक्षण दिले गेले. श्रीयाची जेव्हा नोंदणी झाली होती तेव्हा तिचा क्रमांक 6302 होता पण आता या परिवारात परीक्षेसाठी 3 लाखांपेक्षा जास्त जोडले गेले आहेत.

1 मे रोजी भगवतगीता पाठांतराची परीक्षा गीता परिवारतर्फे घेणात आली. त्यात अत्युत्तम श्रेणीत पास होऊन ‘गीताव्रती’ ही उपाधी प्राप्त केली. संस्कृत भाषेची आवड असून, संस्कृत संभाषण ही कला तिला अवगत आहे. संस्कृतचे प्रशिक्षक दयानंद नाईक यांनी श्रीयामध्ये असलेले गुण ओळखून तिला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिची आजी सुनंदा भटगावकर, आजोबा दुर्गादत्त भटगावकर, आजी सरिता, वडील विशालकुमार वामन नाईक देसाई, आई स्वाती विशालकुमार नाईक देसाई व शिक्षकांचे तिला प्रोत्साहन लाभले.

18 अध्यायांची परीक्षा पूर्ण

या परीक्षेत ऑनलाईन पद्धतीने डोळे बंद करून कुठल्याही अध्यायाची आठ अक्षरे सांगितली जातात. त्याचाच आधार घेऊन पुढचे दोन श्लोक म्हणावे लागतात. व्हिडीओ सुरू ठेवून श्लोक म्हणावे लागतात. परीक्षक सांगतील ते एका अध्यायातील 8 श्लोक शुद्ध कण्ठस्थ म्हणावे लागतात. 18 अध्यायांची परीक्षा घेतली जाते ती श्रीया नाईकने पूर्ण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mallikarjun Kharge Goa visit
Siolim Woman Investment Fraud
Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com