Mahadev Temple Dainik Gomantak
गोवा

Tambadi Surla Village: प्राचीन वैभवाचे निसर्गरम्य साक्षीदार- तांबडी सुर्ला

Tambadi Surla Village: तांबडी सुर्ल्याची निसर्गरम्य संस्कृती आणि इतिहासाचे जतन म्हणजे गोव्याच्या ऐतिहासिक वैभवाची गाथा

Ganeshprasad Gogate

Tambadi Surla Village: गोव्यातील प्रत्येक गावाला त्याचा त्याचा असा ऐतिहासिक वारसा आहे. एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक गावातील भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. इथे मिळणाऱ्या वनस्पती, वन्यजीव, गावातील ऐतिहासिक- धार्मिक वास्तू या सगळ्या गोष्टींमुळे गोव्यातील या छोट्या गावांची ओळख दूरवर झालीय. तांबडी सुर्ला हा सुद्धा असाच निसर्गसंपन्न असं गाव.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला गोव्यातला निसर्गसंपन्न तांबडी सुर्ला गाव भगवान महावीर अभयारण्याच्या परिसरात आहे. एका बाजूला सत्तरीतील म्हादाई अभयारण्याच्या सीमा तांबडी सुर्ल गावाला भिडलेल्या आहेत.

एकेकाळी तांबडी सुर्ला गाव दुर्गम गणला जात होता. आज इथे जाण्यासाठी डांबरी रस्त्याची व्यवस्था आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात कर्नाटकातील घाटमाथ्यावर जाण्यासाठी येथील जंगल वाटांचा लोक, व्यापारी, यात्रेकरू उपयोग करायचे आणि त्यामुळे हा गाव गजबजलेला असायचा.

संपूर्ण सांगे तालुक्यात भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने तांबडी सुर्ला मोठा गाव, क्षेत्रफळाने इतके मोठे गाव गोव्यात अपवादात्मक आहे. सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा, सदाहरित जंगलेआणि रंगाडो, जांभोळी या मांडवीच्या उपनद्या यांनी जलसमृद्धी यांचे वरदान तांबडी सुर्लाला लाभलेले आहे.

कदंबकालीन संस्कृती-

गोव्याच्या पुरातत्त्वीय, ऐतिहासिक, नैसर्गिक संपत्तीचा समृद्ध वारसा लाभलेला - असा दुसरा गाव अन्यत्र आढळणे कठीणच. रगाडो नदीच्या डाव्या किनाऱ्यावर - शेकडो वर्षापासून उभे असलेले कदंबकालीन शिवमंदिर हे या गावचे भूषण आहे.

गोवा - कदंबाच्या मूर्ती आणि वास्तुकलेचा अत्युत्तम आविष्कार काळ्या कातळातील या मंदिराच्या कणाकणातून प्रतिबिंबित झालेला आढळतो. अशा प्रकारचे सुंदर आणि - ऐतिहासिक परंपरा मिरवत आणि ऊन, पाऊस वारा झेलत अभंगपणे उभे असलेले दुसरे मंदिर गोव्यात अन्यत्र नाही.

मंदिरात ठिकठिकाणी असलेली महिषासुर मर्दिनी, सरस्वती, सुब्रह्मण्य, गणपती त्याशिवाय मंदिराच्या वर दक्षिणेला ब्रह्मदेव, भैरव, पश्चिमेला नटराज, उमासहित शंकर, उत्तरेला विष्णू, शिवपार्वती, मुखमंडपातील चतुर्हस्त गणपती ही शिल्पे गोव्यातल्या कदंबकालीन कला संस्कृती, समाजजीवन यांच्या उन्नतीचे दर्शन घडवतात.

मात्र सध्या वाढता खाण व्यवसाय, बेसुमार जंगलतोड, नियम व कायदे कानून यांचे उल्लंघन करून पर्यावरणीय पर्यटनाची भ्रांती निर्माण करणारा व्यवसाय, रेती, दगडगोटे यांचे उत्खनन व अमर्याद उपसा विदेशी वृक्षांचे बेशिस्त - वनीकरण, शेती, बागायतींचा जंगलतोड करून केला जाणारा विस्तार आदी - समस्यांमुळे गाव जराजर्जर होण्याच्या वाटेवर आहे.

तांबडी सुर्लाला कसे जाल?

राजधानी पणजीपासून अंदाजे 65 किलोमीटर तांबडी सुर्ला अंतरावर आहे. सत्तरी तालुक्यातील वाळपई या मुख्य शहरापासून 22 किलोमीटर दक्षिणेस या गावात प्रवेश करता येतो. येथे जाण्यासाठी सरकारी तसेच प्रायव्हेट बसेसची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या वाहनातून देखील या ठिकाणी जाऊ शकता.

(सदर माहिती ही गोव्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून, वेगवेगळे संदर्भ घेऊन संकलित केली असून यातून गोव्याचे सकारात्मक आणि आदर्श चित्र उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Murder Case Goa: गुप्तांग कापले, डोके ठेचले! पर्रा येथे कामगाराचा कोल्ड बल्डेड खून; बाप लेकाला अटक

Viral Video: पठ्ठ्यानं लाथ मारताच ATM मधून पडला पैशांचा पाऊस, नंतर काय झालं? तुम्हीच पाहा व्हिडिओ

Goa Crime: कर्नाटकच्या तरुणांची गोव्यात मुजोरी; युवतीशी गैरवर्तन, दुचाकीला धडक, एक जखमी Watch Video

Bharat Bandh On 9 July 2025: बुधवारी भारत बंद! 25 कोटी कर्मचाऱ्यांनी दिली बंदची हाक; तुम्हाला पडलेल्या 'पाच' प्रश्नांची उत्तरे

Goa Crime: पर्रा हत्याकांडात मजुराच्या निर्घृण हत्येप्रकरणी पिता-पुत्र अटकेत!

SCROLL FOR NEXT