Yuri Alemao: नोकर भरतीबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दोन दिवसांपूर्वी आपले परखड मत व्यक्त केले होते, आणि आज पुन्हा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सावंत सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात पूर्णतः अपयशी ठरलं आहे.
गोव्यात नोकऱ्यांची कमी निर्माण झाल्यानेच गोव्यातील सुशिक्षित तरुणांना परदेशातील नोकऱ्यांचा आधार घ्यावा लागतोय. एवढंच नव्हे तर त्यांनी आणलेल्या परकीय चलनामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला आधार मिळत असताना सरकार त्यांचे नागरिकत्व हिसकावून घेतंय असे ताशेरे आलेमाव यांनी ओढले आहेत.
सरकारने खलाशांसाठीची पेन्शन योजना कायमस्वरूपी करण्याचे आश्र्वासन दिले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतही त्याचा पुनरुच्चारही केला होता. मात्र, अजून सरकारने निवृत्त खलाशांच्या पेन्शनबाबत योग्य तो निर्णय झाला नसल्याचे समजतंय.
याबाबतही आलेमाव यांनी ट्विट केलंय. नोकऱ्यांसोबतच निवृत्त खलाशांना पेन्शनसाठी संघर्ष करावा लागतोय. सावंत सरकार या सुविधा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आलेमाव यांनी म्हटलं आहे.
नोकर भरतीसाठी कोकणीचे ज्ञान आवश्यक करण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणेत नवीन काहीच नाही.भरती नियमांचे पुनरावलोकन करण्याची आणि कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करण्याची वेळ आली आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शनिवारी व्यक्त केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.