लग्नाचे वचन दिले, घरात बोलणी सुरु झाली पण 'तो' शरीराची भूक भागवून पसार झाला; गोव्यात सरकारी अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Goa government officer sexual assault: ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांमधील संपर्क वाढल्यानंतर संशयिताने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दिले.
Goa government officer sexual assault
Goa sexual assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार २४ वर्षीय तरुणीने पणजी महिला पोलिस स्थानकात दाखल केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने अत्याचार केल्याचे तक्ररीत नमूद करण्यात आले आहे. संशयित नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणीतील अधिकारी आहे.

२४ वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयित अधिकारी आणि पीडित तरुणी यांची मार्च २०२३ मध्ये एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांमधील संपर्क वाढल्यानंतर संशयिताने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दिले.

Goa government officer sexual assault
‘युके’स्थित गोमंतकीयांनी गोव्याच्या समस्या मांडाव्यात! कॅप्टन विरियातोंचे आवाहन; आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर करण्याची मागणी

पीडित तरुणी लग्नाला तयार देखील झाली व त्यानुसार लग्नाची घरात बोलणी देखील सुरु झाली होती. दरम्यान, संशयित अधिकाऱ्याने मे २०२३ मध्ये दक्षिण गोव्यात लैंगिक अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला आहे.

Goa government officer sexual assault
Chapora River: शापोरा नदी घेणार ‘मोकळा’ श्‍‍वास! सव्वालाख घनमीटर गाळ निघणार; सात ते आठ कोटींचा येणार खर्च

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, अधिकाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६९, ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताचा त्याच्या घरी शोध घेण्यात आला पण, सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, संशयित अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांशी वाद घातला. तसेच, दोघांच्या लग्नाला नकार देत तरुण आणि तिच्या कुटुंबीयांना देखील मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tarun Tejpal Sexual Assault Case
Tarun Tejpal Sexual Assault Case
Mapusa Child Assault Attempt
Sexual Assault Case Khorlim Mapusa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com