Chapora River: शापोरा नदी घेणार ‘मोकळा’ श्‍‍वास! सव्वालाख घनमीटर गाळ निघणार; सात ते आठ कोटींचा येणार खर्च

Chapora River News: पुढील सहा महिन्यांत तब्बल सव्वा लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. नदीत वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामुळे पाण्याचा प्रवाह अडखळत होता.
Chapora River
Chapora RiverDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शापोरा नदीतील साचलेला गाळ काढण्याचे कंत्राट मुंबईस्थित ‘एनरिच’ या कंपनीला देण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत तब्बल सव्वा लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. नदीत वर्षानुवर्षे साचलेल्या गाळामुळे पाण्याचा प्रवाह अडखळत होता, तसेच पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे हे काम पर्यावरणीयदृष्ट्या अत्यावश्यक मानले जात आहे.

या गाळात रेतीचे प्रमाण मोठे असल्याचे प्राथमिक अहवालांवरून समोर आले आहे. त्यामुळे ही रेती बांधकामासाठी वापरता येईल का, की खोल समुद्रात टाकावी लागेल, हा महत्त्वाचा निर्णय आता सरकारला घ्यावा लागणार आहे. गाळ उपसण्यासाठी अत्याधुनिक ड्रेजिंग यंत्रणा वापरण्यात येणार आहे.

ही यंत्रे नदीतून रेती, माती आणि जैविक अवशेष शोषून घेत किनाऱ्यावर टाकतात. त्यानंतर संबंधित विभाग त्याचे विश्लेषण करून उपयोग ठरवतात. बंदर कप्तान खात्यातील सूत्रांनी सांगितले की, यापूर्वी शापोरा नदीतून गाळरूपी रेती काढून ती कंत्राटदारानेच विकावी, असे नियोजन करण्यात आले होते.

त्या योजनेत सरकारचा कोणताही खर्च होणार नव्हता. मात्र, कंत्राटदार कंपनीने या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगत माघार घेतली. परिणामी आता ७ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चाने हे काम शासन स्वतः हाती घेणार आहे. सरकारने योग्य नियोजन करून ही रेती बांधकाम क्षेत्रासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्यास, राज्यातील रेतीटंचाईत काहीसा दिलासा मिळू शकतो.

Chapora River
Chapora River: रेती प्रश्न सुटला! शापोरातील गाळ निघणार फुकटात; सरकारचे 7 कोटी रुपये वाचणार

अभियानाचा तपशील

एकूण गाळ : सव्वा लाख घनमीटर

कामकाज कालावधी : सहा महिने

प्रकल्प खर्च : ७ कोटी ५३ लाख रुपये

कंत्राटदार : एनरिच कंपनी, मुंबई

Chapora River
Chapora: बेकायदा रेती उपसाकडे पोलिसांची डोळेझाक का? 'शापोरा'त स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये उलगडला धक्कादायक प्रकार

काय होणार लाभ?

पूरस्थितीचा धोका होणार कमी

नदीच्या प्रवाहाला मिळणार गती

बांधकामासाठी रेतीचा पर्यायी स्रोत

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com