Vijai Sardesai of Goa Forward Party slams Dayanand Sopte  Dainik Gomantak
गोवा

विजय सरदेसाई: दयानंद सोपट यांनी मांद्रे मतदारसंघ गहाण ठेवला

दयानंद सोपट (Dayanand Sopte) यांनी मांद्रे मतदारसंघ (Mandrem assembly constituency) गहाण ठेवला. स्वतःचा स्वार्थ साधला, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केले

दैनिक गोमन्तक

दयानंद सोपट (Dayanand Sopte) यांनी मांद्रे मतदारसंघ (Mandrem assembly constituency) गहाण ठेवला. स्वतःचा स्वार्थ साधला, अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष (Goa Forward Party) आजच्या मैत्री-दिनी (Friendship Day 2021) मांद्रे मतदारसंघातून प्रचाराला सुरवात करीत आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते आमदार विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी केले.

विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत पार्से श्री भगवती मंदिरात मांद्रेचे गोवा फॉरवर्डचे उमेदवार दीपक कलंगुटकर यांच्या प्रचाराचा श्रीफळ ठेवून शुभारंभ केला. मांद्रे मतदारसंघाचा दौरा करत असल्यामुळे नागरिकांतर्फे शाल श्रीफळ आणि तैलचित्र देवून आमदार विजय सरदेसाई याचा माजी सरपंच गणपत कलंगुटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार विजय सरदेसाई म्हणाले, भाजपचा खरा चेहरा जनतेलासमजला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाशी युती करणार नाही. गोमंतकयांच्या विकासासाठी पक्ष कार्य करणार आहे.

आमदारकी विकणाऱ्याला परत जनता संधी देणार नाही. मतदारसंघ विकण्याचे काम आमदाराने केले. आता गोवा वाचवण्यासाठी भूमिपुत्रासाठी जमिनी सुरक्षा आणि गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल. आणि त्यासाठी गोवा फॉरवर्ड गोवाभर जनजागृती करत आहे. गोवा गोवेकरासाठी राखून ठेवूया. त्यासाठी दीपक कलंगुटकर सारख्याना आमदाराची संधी द्यावी, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

मांद्रेचे उमेदवार दीपक कलंगुटकर, उषा सरदेसाई, दुर्गादास कामत, पेडणेचे उमेदवार जितेंद्र गावकर, शेखर पार्सेकर, नीलेश कलंगुटकर, पंच अरुण पार्सेकर, गणपत कलंगुटकर, श्री घाडगे आदी उपस्थित होते.

मतदारसंघातून वाढता पाठिंबा

गोवा फॉरवर्डमध्ये गेल्यानंतर कामाला सुरवात केली. पक्षाला मानणारे अनेकजण या भागात आहेत. त्यामुळे मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आज प्रचाराचा श्रीफळ ठेवला. भगवती देवीचा आशीर्वाद घेतला आहे. आजच्या दिवशी मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. शिवाय टॅक्सी व्यवसाय, मांद्रे येथील होऊ घातलेल्या मनोरंजन सिटीवर नागरिकांसोबत चर्चा करण्यात येणार आहे, असेही दीपक कलंगुटकर यांनी सांगितले.

३०० कोटी कर्ज

राज्य चालवण्यासाठी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे ३०० कोटी कर्ज घेतात. त्यातले २५० कोटी रुपये हे पगारावर खर्च केले जातात. हे त्यांनाही कळत नाही, म्हणून ते विधानसभेचे अधिवेशन तीन दिवसात संपवतात, असेही सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

Rajinikanth Honoured at IFFI: इफ्फीत थलैवा 'रजनीकांत' यांचा होणार विशेष सन्मान! चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरव सोहळा

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांस धक्का; कोणते मतदारसंघ राखीव? वाचा..

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

SCROLL FOR NEXT